Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

*शब्द झोपले तर समाज झोपतो,शब्द पेटले तर इतिहास बदलतो...* *फातिमा शेख यांना विचारात जपा,लेखणीतून जिवंत ठेवा*--- *नूरजहाँ शेख*

 *अकलूज ---प्रतिनिधी*

    *एहसान.   मुलाणी*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*



ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा मार्फत

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या चौथे युगास्त्री फातिमा शेख साहित्य संमेलनातील कवी संमेलनाध्यक्ष नूरजहाँ शेख यांनी केलेले भाषण अत्यंत दमदार, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी ठरले. "*अन्याय मी सहन करणारी नाही ,दडपशाहीला तुडवणारी आणी लेखणीने बदल घडवणारी आहे **" *घेवून चालते मी मशाल फतीमाची   विज्ञान मनात माझ्या कुराण ह्रुदयात आहे*  उपस्थित  सर्व साहित्य रसिक व कवींना उद्देशून कवीनो लिहा शब्द झोपले तर समाज झोपतो ,शब्द पेटले तर इतिहास बदलतो अशा दमदार शब्दांतून सामाजिक वास्तव, स्त्री–पुरुष समानता, संविधानिक मूल्ये आणि साहित्याची जबाबदारी प्रभावीपणे मांडली गेली


“कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती अन्यायाविरुद्धची लढाई आहे,” असे ठणकावून सांगताना अध्यक्षांनी कवी-लेखकांना निर्भीडपणे सत्य मांडण्याचे आवाहन केले. त्यांच्या आक्रमक पण संवेदनशील शैलीने उपस्थित रसिक भारावून गेले.स्त्रीला दुय्यम ठरवणाऱ्या मानसिकतेवर त्यांनी निर्भिडपणे प्रहार करत लेखणीचे शस्त्र हे अन्यायाविरुद्ध चे प्रभावी हत्यार असल्याचे ठणकावून सांगितले.


भाषणादरम्यान वारंवार टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक कवींनी अध्यक्षीय भाषणामुळे नव्या उर्जेने लेखन करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण संमेलनाला दिशा देणारे व आत्मभान जागवणारे हे भाषण ठरले, अशी प्रतिक्रिया रसिक व साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.

या संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सहत्यिक डॉ.श्रीपाल सबनीस व सौ ललिता सबनीस तसेच संस्थापक शफी बोल्डेकर ,कार्याध्यक्ष खजभाई बागवान ,सह सचिव अनीसा शेख ,जिल्हाध्यक्ष दीलशाद शेख ,सम्मेलनअध्यक्ष मेहमूदा शेख ,समाजसेवक डॉ.सलीम शेख आदी साहित्यिक मान्यवर व राज्यभरातून आले कवी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा