*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण येथील हिंदुस्तान हॉटेल येथे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्य
कर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, तर उपस्थितांनी शहाजीराव पाटील यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याचा गौरव केला.
जनतेशी कायम नातं जपणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर असलेले नेतृत्व म्हणून शहाजीराव पाटील यांचा उल्लेख यावेळी उपस्थितांनी केला. वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करण्यात आली.
हा सोहळा आनंद, उत्साह आणि स्नेहभावनेने भरलेला ठरला. यावेळी प्रसिद्ध उद्योजक सैलानी भाई उर्फ सलीम शेख बागवान बाळासाहेब सोनके विजय गायकवाड कलीम भाई बागवान DK news संपादक दादाभाई खतीब जुबेर डांगे पाशाभाई पठाण ऐलान पत्रकार ताज खा पठाण किरण पाटील संजय कासार मनोज पाटील सैलानी भाई उर्फ सलीम शेख बागवान यांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला व उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा