*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून शिवसेनेत तन-मनदानाने काम करून आंदोलनातील केस अंगावर घेऊन धनुष्यबाण घराघरात पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली
शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा असून कार्यकर्त्यांना न्याय देणे व घराघरात धनुष्यबाणचिन्ह पोहोचवणे यासाठी ही निवडणूक लढवीत असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधून उमेदवारी न मिळणारे सक्षम नाराज उमेदवार शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार असून लवकरच या सर्वांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारांची यादी सादर करण्यात येणार आहे
चिकलठाण जिल्हा परिषद मतदार संघातून
युवा नेते शंभूराजे जगताप प्रसिद्ध उद्योजक अण्णा घाडगे यांनी उमेदवारी मागणी केली आहे
फिसरे पंचायत समिती गणातून डॉक्टर गौतम रोडे
वीट गणातून युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे
केतुर गणातून संतोष वारगड
सहज जवळपास 15 जणांनी उमेदवारी मागणी केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व स्थानिक गटातटाच्या राजकारणाला कंटाळलेली सक्रिय कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार आहे
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही भेट घेऊन सन्मानकारक जागा दिल्या तर भाजपशी युती करायची तयारी असल्याची भावना युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे डॉक्टर गौतम रोडे युवा सेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत राखुंडे युवा नेते शिवराज जगताप यांनी व्यक्त केली आहे
बच्चू कडू यांची प्रहार संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनशक्ती संघटना राष्ट्रीय समाज पक्ष आधी पक्षातील कार्यकर्ते सुद्धा शिवसेना बरोबर आघाडी करण्यास तयार असून जिल्ह्यातील वरिष्ठ नेते जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम भूमिका शिवसेना स्पष्ट करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा