Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

*नो डीजे...नो डॉल्बी उपक्रमाचे जिल्ह्यात भरभरून कौतुक* *सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम*

 *ज्येष्ठ पत्रकार* 

*संजय लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत व ते जनतेच्या हितासाठी असून सर्वसामान्य नागरिकांना समाधान,आनंद व अभिमान वाटावेत असे ते उपक्रम आहेत.अतुल कुलकर्णी यांचा असाच एक अत्यंत लोकहिताचे दृष्टीने समाधान व आनंद देणारा उपक्रम म्हणजे " नो डॉल्बी नो डीजे " या उपक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात, तालुक्यात,शहरात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.गावोगावच्या यात्रा उरुस सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम तसेच वाढदिवस जयंतीनिमित्त कर्णकर्कश आवाज असलेले डीजे डॉल्बी लावून अनेकांना त्याचा मानसिक स्वास्थ्य बिघडवणारा आरोग्य धोक्यात आणणारा विषय होता तसेच वृध्द व्यक्ती,आजारी रुग्णांना डीजे डॉल्बीमुळे त्रास होत होता. मिरवणूक,लग्न सोहळा यांमध्ये सर्रास मोठ्या प्रमाणात डीजे डॉल्बी लावून वातावरणात आवाजाचे प्रदुषणाचा प्रश्न अनेकदा डोकेदुखी ठरली होती मात्र अत्यंत शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष आदर्श प्रामाणिक अधिकारी अशी आपल्या कर्तबगार कामगीरीने नेहमीच जनहित लक्षात घेऊन आपले कर्तव्य पार पाडणारे.       

                सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यात नो डीजे नो डॉल्बी हा उपक्रम हाती घेतला व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये हा उपक्रम राबविला त्यामुळे सर्व सामाजिक सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे सध्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सुरू झाला आहे.एकाही मंडळाने डीजे डॉल्बी सांगितला नसल्याचे दिसून आले आहे.अनेकांनी पारंपरिक वाद्ये,सांस्कृतिक कार्यक्रम,ऐतिहासिक देखावे असे स्वरूप निश्चित केले आहे. मिरवणुकीत पारंपरिक लेझीम, सनई,चौघडा,ढोल,ताशे,हलगी या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.ही बाब अत्यंत कौतुकास्पद व अभिमान वाटावी अशी सुखद घटना व उपक्रम आहे अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी यांना नो डीजे नो डॉल्बी या उपक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले की आपापल्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून नो डीजे नो डॉल्बी उपक्रमाचे महत्व पटवून द्या. पारंपरिक वाद्ये मर्दानी खेळ याचे महत्व समजावून सांगा डीजे चा आवाज त्याचे दुष्परिणाम धोका सांगा असे त्यांनी मिटिंगमध्ये सांगितले आहे एवढे करूनही जे मिरवणुकीत यात्रेत उत्सवात डीजे डॉल्बी लावत असतील तर तो डीजे डॉल्बी जप्त करुन संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.एकंदरीत हा सर्व विषयांवर सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांतून अतुल कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा