Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कारांची घोषणा.*

 *अकलूज- प्रतिनिधी* 

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शंकरनगर (ता.माळशिरस) येथील

श्री विजय गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिले जाणारे मानाचे " सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार - २०२६ " जाहीर करण्यात आले आहेत. या गौरव सोहळ्याचे आयोजन सोमवार दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता उदय सभागृह शंकरनगर येथे करण्यात आले आले असल्याची माहिती पुरस्कार समितीच्या अध्यक्षा  स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

        या पुरस्काराचे मानकरी व त्यांचे कार्य डॉ.जयसिंगराव पवार (विशेष जीवनगौरव पुरस्कार) ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणून डॉ.जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासावर त्यांनी केलेले सखोल संशोधन महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाला नवी दिशा देणारे ठरले आहे.डॉ. सदानंद देशमुख (विशेष पुरस्कार) मराठी साहित्यातील ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणारे प्रख्यात कादंबरीकार,त्यांच्या 'बारोमास' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामीण जगण्यातील संघर्ष आणि शेती संस्कृती त्यांच्या लेखनाचा मुख्य गाभा आहे.कवी नारायण सुमंत (साहित्यिक पुरस्कार) एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक जाणिवा आणि मानवी भावभावनांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते.

            हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २३ फेब्रुवारी २०२६ सकाळी १०:०० वाजता उदय सभागृह शंकरनगर येथे आयोजित केलेला आहे.श्री विजय गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला परिसरातील सर्व साहित्यप्रेमी,वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा,शाल व श्रीफळ असे आहे.आयोजकः श्री विजय गणेश उत्सव मंडळ आणि मराठी साहित्य परिषद शाखा अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा