इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. 9922419159
बारामती व पुणे येथे वैद्यकीय सेवा देणारे फिजिओथेरपिस्ट डॉ. रोहन अकोलकर यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन इतिहास घडविल्याने 'वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये त्यांच्या नावाची व कार्याची नोंद झाली आहे. त्यामुळे बारामती व पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी हेड क्वार्टर, लंडन येथे
डॉ अलेस्सांद्रो जॉर्जि यांच्या हस्ते डॉ. रोहन अकोलकर यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारताचे नाव क्रीडा विश्वात उंचावणारी अभिमानास्पद कामगिरी नामांकित फिजिओथेरपिस्ट डॉ. रोहन अकोलकर यांनी केली आहे. डॉ. रोहन अकोलकर यांची 'वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स' ( World Excellence Book of Records) मध्ये गौरवपूर्ण नोंद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये महत्त्वपूर्ण सेवा देणारे ते भारतातील पहिले आणि एकमेव फिजिओथेरपिस्ट ठरले आहेत. विविध जागतिक स्पर्धांमधील अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
डॉ. अकोलकर यांनी आतापर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये आपले योगदान दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
फिफा वर्ल्ड कप ( फुटबॉल ) सन २०१८ आणि २०२२ मध्ये अधिकृत फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांनी लक्षवेधी काम केले आहे तर
पॅरिस ऑलिम्पिक्स सन २०२४ मध्ये ऑनफिल्ड फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांनी सेवा केली आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्स सन २०२८ मध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तज्ज्ञ म्हणून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याने भारताचा मानसन्मान उंचावला आहे.
क्रीडा क्षेत्रासह त्यांची सामाजिक बांधिलकी देखील आहे.
केवळ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच नव्हे, तर डॉ. अकोलकर यांच्या मानवतावादी कार्याची देखील दखल या विक्रमात घेण्यात आली आहे. ते एलिट खेळाडूं सोबतच शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या उपचारांसाठी देखील नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 'द अचिव्हर्स - लेजेंड्स ऑफ इंडिया' मध्ये स्थान मिळाले असून २५ जानेवारी २०२६ रोजी त्यांना या अधिकृत प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, भारतीय क्रीडा वैद्यकशास्त्र (Sports Medicine) क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा