Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

पळसदेव शेलार पट्ट्यात शिवजयंती निमित्त लोकप्रतिनिधी यांच्या सत्काराबरोबरच विविध उपक्रम, निरोगी शेलारपट्टा अभियानाचा शुभारंभ.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९



उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसित पळसदेव ( ता. इंदापूर ) परिसरातील शेलारपट्टा येथे शिव जयंती निमित्त नूतन लोकप्रतिनिधी यांच्या सत्काराबरोबरच विविध उपक्रम राबविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त जय भवानी, जय शिवाजी, राजमाता जिजाऊ की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात सकाळी वस्ती मधून आबालवृद्ध शिवप्रेमींच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. हातात भगव्या पताका घेऊन पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी तोफांच्या सलामीसह पालखीचे जंगी स्वागत केले. सर्वांनी घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली होती. यावेळी श्री. घाडगे परिवाराकडून पालखीवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.



यानिमित्त वस्तीवर सगळीकडे भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे परिसर भगवामय झाला होता. 

पालखी दरम्यान एस बी स्पोर्टस च्या वतीने साहसी खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. लाठी, दानपट्टा व साहसी खेळाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. यावेळी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाळणा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा शेलारपट्टा येथील विद्यार्थ्यांसह शिवभक्तांनी आपले मनोगत व्यक्त करून महाराजांनी दिलेली शिकवण आत्मसात करून आचरण करण्याचे आवाहन करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाणी व्यवस्थापन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू शकते मात्र यावर ठोस अंमलबजावणी करण्याची आवशकता असल्याचे मत यावेळी शिवभक्त मयुरी शिंदे  यांनी व्यक्त केले.

शिवजयंतीच्या निमित्त अघण्या आयुर्वेद, पळसदेव व पवार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने निरोगी शेलारपट्टा अभियान सुरु करण्यात आले. हे अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना  संपूर्ण शेलारपट्टा ग्रामस्थ व उपस्थित शिवभक्तांनी श्रद्धांजली अर्पण करत असा नेता पुन्हा होणे नाही, आपण एका कामाच्या माणसाला मुकलो असल्याची भावना या वेळी उपस्थितांनी अजित पवार यांच्या बाबत व्यक्त केली.

  यावेळी नूतन पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, कीर्ती काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण काळे, कोमल बनसुडे, डॉ. ऋषिकेश शिंदे व प्रियांका काळे, सुभाष बनसुडे, विशाल बनसुडे, सुजित मोरे, बबन बनसुडे, भारत काळे, कल्पना फुले, धीरज काळे, अनिल काळे, छगन बनसुडे, अजित शिंदे, प्रमोद शेलार, अनिकेत शिंदे, रमेश पवार, कालिदास गोडगे, पवार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रामदास पवार, संतोष शिंदे, रमेश नगरे, सतीश शिंदे, महेंद्र घाडगे, अक्षय भोसले, बाबा शिंदे, संजय भोई, अमर इंजे, वैभव शिंदे, सचिन मोहिते, दशरथ भोई सह शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा