Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

इंदापूर मध्ये तनिष्का "स्त्री प्रतिष्ठा अभियान नोंदणी सुरू, ५९९ रुपयात सभासदांना मिळणार गिफ्ट व विविध कार्यक्रम : तालुका समन्वयक सारिकाताई पवार.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. 9922419159


दैनिक सकाळ माध्यम समूहाचे "तनिष्का" स्त्री प्रतिष्ठा अभियानाची इंदापूर शहर व परिसरात नोंदणी सुरू झाली असून जास्तीतजास्त युवती व महिलांनी सामाजिक व सांस्कृतिक कार्य, आत्मनिर्भरता, व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन या अभियानाच्या इंदापूर येथील मुख्य संयोजिका सारिकाताई पवार यांनी केले आहे.

सारिकाताई पवार पुढे म्हणाल्या, विविध उपक्रमा व्दारे या अभियानात काम करण्याची संधी  महिलांसाठी उपलब्ध झाली असून महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेणे गरजेचे आहे. दैनिक सकाळ माध्यम समूहाचे" तनिष्का" स्त्री प्रतिष्ठा अभियान हे १३ वर्षापूर्वी सुरू केले असून दैनिक सकाळचे प्रतिनिधी स्वर्गीय डी. आर. कुलकर्णी सर, तत्कालीन प्रतिनिधी डॉ. संदेश शहा, सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय डॉ. राधिका संदेश शहा यांच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात इंदापूर मध्ये झाली होती. त्यावेळेपासून मी या अभियानात मुख्य संयोजिका म्हणून काम करत आहे. या अभियानात आपण सर्व सहभागी होऊन स्वतः बदलूया, आपली आर्थिक, सामाजिक, बाजू भक्कम करूया आणि भरारी घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करूयात. यासाठी आपल्या पाठीशी भक्कमपणे  सकाळ माध्यम समुह उभा असून याची आंतरराष्ट्रीय स्तरावर किर्ती आहे. ज्या समूहाने प्रथमच महिलांना केंद्र बिंदू मानून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून ""तनिष्का "स्त्री प्रतिष्ठा अभियान गेली १३ वर्षे निरंतरपणे सुरू आहे. इंदापूर मध्ये डॉ. राधिका शहा यांच्या बरोबर काम सुरू होते मात्र कोरोना महामारी नंतर ते बंद झाले होते. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर शहरात हे अभियान जोरात सुरू असून चालू महिन्या पासून मी पुण्यात या अभियानाचे ट्रेनिंग घेऊन आले आहे. या अभियानात इंदापूर तालुका समन्वयक म्हणून मला जबाबदारी देण्यात आली असून  आपण सर्वांनी एकत्र मिळून महिलांसाठी छान उपक्रम राबवू यात. या अभियानात सभासद होऊन सहभागी होण्यासाठी ५९९ रुपये नोंदणीमूल्य असून त्यात तुम्हाला वेल कम गिफ्ट म्हणून तुमच्या नावाचे आयडेंटीटी कार्ड मिळेल, वर्षभरात काय कार्यक्रम होतील ती डायरी मिळेल, ३ भांडी सेट झाकण सहित मिळणार आहे, शिवाय लॉरियल या ब्रँड चे स्काल्प ट्रीटमेंटचे २६५० रुपयांचे गिफ्ट  अगदी मोफत मिळणार आहे. ५९९ रुपयांमध्ये  आपल्याला गिफ्ट  

 मिळून महिलांसाठी रोजगार, आरोग्य, कौशल्यावर आधारित मोफत प्रशिक्षण इत्यादी  मोफत वर्षभर सुविधा उपलब्ध मिळणार आहेत. त्यामुळे इच्छुक महिलांनी  ७७९८६०१४४४ या मोबाईल क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा