Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

रमजान ३ *पुण्यकार्याची अनुभूती देणारा पवित्र महिना - रमजान*

 *सलीमखान पठाण* 

*श्रीरामपूर* 

*मो:-9226408082*


इस्लामी वर्षाचा नववा महिना म्हणजे रमजान.अनादी काळापासून या महिन्याचे महत्त्व अगाथ आहे.अल्लाह चा महिना म्हणून देखील याला संबोधले जाते.जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्याचे भक्तीभावाने पालन करतात. काल एक मित्र मला म्हणाला कि या वर्षी रमजान महिना लवकर आला आहे का ? पण तसे नाही.


 इस्लामी वर्ष (हिजरी वर्ष) हे चांद्र कालगणनेवर आधारित असते. इस्लामी वर्षात

साधारणपणे ३५४ दिवस

काही वर्षे (लीप वर्ष) ३५५ दिवस असतात.

इस्लामी वर्षाची सुरुवात हिजरी सनापासून होते.

हे चंद्राच्या महिन्यांवर आधारित असल्यामुळे प्रत्येक महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो.

 इस्लामी वर्षातील १२ महिने -मुहर्रम,सफर,रबीउल अव्वल,रबीउल आखिर,

जमादिल अव्वल,

जमादिल आखिर,रजब,

शाबान,रमजान,शव्वाल,

जिलकाद,जिलहज्ज.

इस्लामी वर्ष: 354/355 दिवस तर 

इंग्रजी (ग्रेगोरियन) वर्ष: 365/366 दिवस

म्हणून इस्लामी वर्ष इंग्रजी वर्षापेक्षा साधारण 10–11 दिवसांनी कमी असते.

 इस्लामी कालगणनेची सुरुवात इ.स. 622 मध्ये झाली.

त्या वर्षी पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) यांनी मक्का येथून मदिना येथे स्थलांतर केले.

या घटनेला हिजरत म्हणतात, म्हणूनच याला हिजरी सन म्हणतात.

 हिजरी वर्ष चंद्रावर आधारित कालगणने नुसार गणले जाते.

प्रत्येक महिना नवीन चंद्र (हिलाल) दिसल्यावर सुरू होतो.

महिना साधारण 29 किंवा 30 दिवसांचा असतो.

12 महिने मिळून एकूण 354 दिवस होतात.

लीप वर्ष (355 दिवस)

काही वर्षे 355 दिवसांची असतात.

30 वर्षांच्या चक्रात 11 वर्षे 355 दिवसांची येतात. हिजरी महिने ऋतूंशी जोडलेले नसतात.

ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे (इंग्रजी वर्ष) ऋतूंशी संबंध नसल्यामुळे रमजान,हज इ. महिने दरवर्षी सुमारे 10–11 दिवस आधी येतात.

रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिमाची दिनचर्या बदललेली असते.पहाटे उठून सहेरी खाणे,नंतर फजर ची नमाज,कुरआन शरीफ ची तीलावत,अल्लाह चे नामस्मरण,दुपारी जोहरची नमाज,सायंकाळी असरची नमाज,सूर्यास्ताच्या वेळी रोजा सोडणे व मगरीब नमाज अदा करणे,जेवण करणे,रात्री ईशा व तरावीहची नमाज अदा करणे याबरोबरच सर्व प्रकारचे पुण्यकार्य या महिन्यात केले जाते आणि म्हणून पुण्यकार्याची अनुभूती देणारा महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.


*सलीमखान पठाण*

*9226408082.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा