*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
राज्य परिवहन महामंडळ अकलूज आगार शिवजयंती सोहळ्यास प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर तसेच माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील
माननीय श्री पांडुरंगराव चांगोजीराव देशमुख, डॉ विश्वास देशमुख उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक करताना चंद्रशेखर गायकवाड यांनी "कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प पेन्शन मिळते त्यामुळे अनेक कर्मचारी आणि अधिकारी निवृत्तीनंतर इतर ठिकाणी त्यांना ना इलाजाने काम करावे लागते तरी माननीय आमदार महोदयांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा" अशी मागणी केली त्यावेळी माननीय उत्तमराव जानकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की "येणाऱ्या अधिवेशनात रात्र महामंडळातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा पेन्शनचा मुद्दा विधानसभेत मांडणार तुम्हाला न्याय मिळवून देणार "
यावेळी सुरक्षित सेवा केल्याबद्दल चालकांचा सत्कार यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सत्कार माननीय आमदार महोदय यांनी केले तसेच अकलूज आगारातील साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांचे "सह्याद्रीच्या कर्तुत्वाची यशोगाथा "या विषयावर व्याख्यान झाले अकलूज आजारातील सर्व कर्मचारी आणि श्रोत्यांसाठी शिव भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा