*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
मुस्लिम धर्मियांमध्ये पाच तत्वा पैकी रोजाला विशेष महत्त्व आहे सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना चालू झाला आहे अशा या कडक रमजानच्या महिन्यामध्ये पहिला रोजा करमाळा शहरातील कुमारी अलीझा बागवान या पाच वर्षीय चिमुकलीने रमजानचा रोजा पूर्ण केला अवघ्या अल्पवयात त्यांनी असा हा कडक रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे
करमाळा शहरातील बागवान नगर येथील राहणारे रहिवासी तसेच आरमान फ्रुट स्टॉलचे व्यवस्थापक असीम शौकत बागवान यांच्या कुमारी अलिझा असीम बागवान अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे त्याने सदरचा उपवास घरीच सोडला अगदी लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मुस्लिम समाजा मधून विशेष कौतुक होत आहे त्याला या कामी आई, वडील तसेच आजोबा शौकत बागवान यांचे विशेष मार्गदर्शन लाभले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा