उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
शिवशंभू प्रतिष्ठान तर्फे गणेशगाव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम
राबविण्यात आला. पवित्र रमजान महिन्यात रोजे धारक मुस्लिम बांधवांना इफ्तारीसाठी फळांचे वाटप करून सामाजिक सलोखा व बंधुत्वाचा सुंदर संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत होते त्याचे अनुकरण गणेश गाव ग्रामस्थांनी केले असून महाराजांच्या आरमारामध्ये फक्त एकाच कोणत्या समाजाचा समावेश नव्हता तर प्रत्येक समाजाच्या मावळ्यांचा त्यामध्ये समावेश होता त्याचाच धागा धरून ग्रामस्थांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केवळ उत्सव साजरा न करता त्यांच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांची प्रत्यक्ष कृतीतून जपणूक करण्यात आली. या उपक्रमामुळे गणेशगावमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.
हिंदू-मुस्लिम ऐक्य, परस्पर सन्मान आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सण साजरे करण्याची परंपरा अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
खऱ्या अर्थाने हीच शिवजयंतीची खरी शिकवण ,एकता, बंधुता आणि मानवता!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा