Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

**स्वागत रमजानचे*

 *तहेसीन मसुदअली लातूर* 

*(UBAB 🖋️)*

*9822220773*



*स्वागत रमजानचे*


शांतता प्रार्थना बंधू भावाने

स्वागत करावे रमजानचे,

दिवस हे उपवास उपासना

दानधर्म व आत्मशुद्धीचे!१!


करून त्रिवेणी संगमच यांचा

शरीर मन अध्यात्म एकत्र,

रोजा नमाज कुराण पठण

करूया महिन्यात या पवित्र!२!


दूर करून मनातीलद्वेष 

गर्व व नकारात्मकता,

करावी ईश्वरास प्रार्थना 

दे पाप व वाईट विचारांपासून मुक्तता !३!


समर्पणाचा सुवर्णकाळ हा

भरभरूनअल्लाहची रहमत,

प्राणीमात्रांवर दया करूनी

उदारतेने गरजुना करावी मदत!४!


घर परिसरआणि मन यांची

करावी सुंदर सजावट, 

प्रसन्न चित्त व तनामनाने

करावी खूप इबादात!५!


*तहेसीन मसुदअली लातूर* 

*(UBAB 🖋️)*

*9822220773*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा