Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नं. 02, रा, शुक्रवार दिनांक 20-02 -2026 विषय :- रोजा :- आज संधी आहेत त्या प्रत्येक क्षणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करा.

डॉक्टर सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा मल्टिस्पेसेलिटी हॉस्पिटल 
मिल्लतनगर वॉर्ड नंबर 01
श्रीरामपूर 
जिल्हा :- अहिल्यानगर 
9271640014.
वैद्यकीय, लेखक, पत्रकार, स्टंभ लेखक, संपादक, गडकिल्ले अभ्यासक, झाडें लावा झाडें जगवा व पर्यावरनाचा समतोल राखा चळवळ संस्थापक, वाचन चळवळ,
विद्रोही संस्कृतीक चळवळ राज्य सदस्य व श्रीरामपूर अध्यक्ष.



" बांधवानो! जेव्हा जुमूआ - ( शुक्रवार) च्या दिवशी तुम्हाला ' अजान ( बांग ) देवून (पुकारले )(सफ्ताहिक प्रार्थना )नमाजसाठी येण्याचे आवाहन केले जाईल!, तर, त्यावेळी तुम्ही,अल्लाह ( परमेश्वर ) च्या (स्मरण रूपी )नमाज साठी लगेच लवकरच, घाई करून, हातातील काम लवकरात लवकरच आटोपून, सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करून लागलीच नमाज (प्रार्थना ) साठी मस्जिद (ग्रह) कडे निघा. :, हें तुमच्या साठी चांगलं राहील, जर तुम्ही  या गोष्टीचं महत्व जाणाल तर. ". ( पवित्र कुरआन सुरहा नंबर 62, सुरहा जुमाआ,आ. नं. 09), 
         मग नमाज( प्रार्थना )जेव्हा पूर्ण होईल तेंव्हा भूतलावर पसरले जाऊन आणि, अल्लाह च्या कृपाप्रसादाचा ( रोजी रोटी इत्यादी,) शोध घ्यावा ". पवित्र कुर 'आन ( पवित्र कुरआन सुरह नं. 62,सुरहा - जुमाआ, आ. नं. 10).
प्रत्येक धर्मात आठवड्यातील एक दिवसाचं खास महत्वं असतो,आठवड्यात एकदा तरी एकत्र येऊन सामुदायिक पणे प्रार्थना नमाज  होऊन विचार आचार यांचे आदनप्रदान झालं पाहिजेत. अर्थात गेट टुगेदर.
जुमूआ "या शब्दाचं आपभ्रनश झाल्या मुळे बोली भाषेत महाराष्ट्रात जुम्मा झालं, अर्थातच  ईद चा दिवस,
व्यापारी -व्यवसायिक, गावोगावी व्यापार करणारे, फेरीवाले, गावोगावी फेरी करणारे, गाव सोडून खूप दूरवर प्रवास करून आपल्या उपजिवेकेसाठी भ्रमंती करून पोट भरणारे,  गाव सोडून लांब जाऊन  आठवडाभर ज्या गावात फेरी व्यापार करत त्याच गावात मुक्कामी राहतात,  ज्या ठिकाणी (प्रार्थना )नमाज ची सोय नाहीत , आजच्या भाषेत लोकप्रिय पि जी  (पैयीन्ग गेस्ट ), राहून, गरीब मजदूर, कष्टकरी,मजुरी करून आठवड्यातील एक सुट्टी घेऊन  घरातील  दैनंदिन गरजेचे वास्तू आणून, आठवड्यातील एक दिवस "ईद "  म्हणून  मिठाई कुटुंबाबरोबर आनंद घालवत  मित्रां - स्वकीय,  आजारी असलेल्या मित्र शेजारी - नातेवाईकांना भेटण्यासाठी जातात.. 




                 प्रेषित मुहम्मद स्व.नीं सांगितलं  कीं,"  आप्त- नातेवाईक - मित्र हें   आजारी असताना त्यांना भेटायला जाणं हें फार सबाब ( पुण्य ) काम आहेत ".असो.
 हजरत अबू हुरेरा रजि.हें सांगतात की  आम्हांला  पैगंबर मुहम्मद स्व. यांनी सांगितलं की, " जुमूआ ( शुक्रवारी ) च्या दिवस भरात - एक क्षण असा खास असतो किं अल्लाह ( परमेश्वरा )नें त्यावेळी  तुमच्या साठी तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा चे फळ भेटण्याचा योग ठेवला आहेत.त्या इच्छा पूर्ण होतात अर्थातच  प्रार्थना (दुआ ) कबूल - पूर्ण होते."
परंतु, प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " ती शुभ वेळ, शुभ घडी फार थोड्याच क्षणा पुरतेच असते. "
आज रमजान मुबारक चा फक्त्त दुसरा रोजासह जुमूहा आहेत, संधी आजच्या भाषेत मोठी सुपर बिग ऑफर चालून आलेलीच आहेत   त्या क्षणाचा वेळेचा जरूर सदुपयोग करून घ्यायला हवा.गाफिल राहू नका अल्लाह( परमेश्वरा )जवळ जेवढं करुणा- दयाशांती सुख समृद्धी निरामय निरोगी आयुष्य -आरोग्य मागता येईल तेवढे जरूर मागा, विनवणी करा, त्याच्या खजिन्यात जेवढे सात समुद्रातील पाणी आहेत त्याच्या एका  थेंबा पेक्षा ही थेंब  एवढं ही कमी होणार नाहीं.  अल्लाह (परमेश्वर )तर कृपाळु तर आहेतच..
( मित्रांनो लेख आवडला तर जरूर आपल्या नातेवाईक मित्र यांना पाठवा, प्रतिक्रिया अवश्य कळवा )



लेखक :- डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा मल्टिस्पेलिटी दवाखाना.
मिल्लत नगर, 
श्रीरामपूर 
मोबाईल :- 9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा