Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

*करमाळा तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये* *जेऊरच्या लाल मातीतल्या पैलवानाने दिली विरोधकांना अखेरपर्यंत कडवी झुंज*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यातील जेऊर येथील लाल मातीतल्या पैलवानाने विरोधकांना अखेरपर्यंत कडवी झुंज देऊन आपला गड सही सलामत ठेवण्या कामी मोठी कामगिरी बजावली एकट्या बहादराने विरोधकांना सळो कि पळो करून सोडले होते अखेर विरोधकाशी दोन हात करीत पैलवानाने आपला बालेकिल्ला अखेरपर्यंत ढळू दिला नाही 

ना कोणता राजकीय वारसा नसताना देखील करमाळा पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेऊर येथील लाल मातीत खेळणारा पट्टा आमदार नारायण आबा पाटील यांनी विरोधकांना अखेरपर्यंत आपली ताकद दाखवून आपला बालेकिल्ला मजबूत ठेवला एकीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार दोन माजी आमदार असताना देखील कशाचीही तमा न बाळगता आपल्या कार्यकर्त्यासहित रात्रंदिवस प्रचार करीत अखेर त्या बहाद्दर पैलवानाने आपला बालेकिल्ला मजबूत ठेवला एकीकडे तिन्ही गटातील शक्ती एकवटून सत्ताधारी नारायण आबा पाटील यांना अडचणीत व कोंडीत आणण्याचा प्रयत्न करीत होते विरोधकांनी मात्र त्या लाल मातीत खेळणाऱ्या पट्ट्यावर अनेक खालच्या पातळीचे भाषणे केली होती तरीदेखील त्या पैलवानाने त्यांना उत्तर देण्याचे टाळले मात्र तरी देखील आमदार पाटील यांनी कशाचीही भीती न बाळगता अखेरपर्यंत त्या तिन्ही शक्तीच्या विरुद्ध लढा दिला आजही करमाळा शहर व तालुक्यात आमदार नारायण आबा पाटील यांच्या विजयाची गाथा संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चिली जात आहे एकटा लाल मातीतला पैलवान व त्यांचे मावळे धनशक्ती विरोधात लढा देत राहिले सदरची करमाळा तालुक्यामधील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणुकी संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील पैलवानाच्या नावाने चर्चिली जात आहे  एकंदर पाहता करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच पहावयास मिळाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा