*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा पंचायत समितीच्या तसेच जिल्हा परिषदेच्या आज करमाळा तहसील कार्यालय शेजारी शासकीय गोदामा मध्ये झालेली मतमोजणी शांततेच्या वातावरणात पार पडली संपूर्ण करमाळा तालुकावाशीयांचे नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी मात्र सर्वच पक्षाला तसेच स्थानिक विकास आघाडीला जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये समान जागा देऊन एक प्रकारे लक्ष वेधून घेतले आहे मात्र पंचायत समितीच्या महायुतीच्या एकूण आठ जागेवर महायुती आघाडीने बहुमत सिद्ध केल्याने पंचायत समिती महायुतीकडे जाणार हे मात्र निर्विवाद सत्य आहे पंचायत समितीवर महायुतीचे बहुमत सिद्ध झाल्याने आगामी काळात पंचायत समितीचा सभापती कोण होणार याकडे देखील लक्ष लागले आहे
करमाळा तालुक्यातील अटीतटीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये एकूण सहा जिल्हा परिषदेच्या तर 12 पंचायत समितीच्या निवडी होत्या आज झालेल्या निकालानुसार करमाळा मतदारांनी सर्वच पक्षातील तसेच तालुका विकास आघाडीतील सर्वच उमेदवारांना समसमान जागेवर निवडून दिले आहे
जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीतील विजय उमेदवार पुढील प्रमाणे,पांडे गट,,,,,, रश्मी दिगंबरराव बागल, वीट गट,, अश्विनी गणेश चिवटे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,, कोर्टी जिल्हा परिषद गट,, वनिता गुळवे, चिखलठाण गट,, प्रशांत पाटील
करमाळा तालुका विकास आघाडी जिल्हा परिषद गट विजय उमेदवार,,,, केम गट सौ कल्याणी तळेकर, वांगी गट सौ रुपाली गोडसे
करमाळा तालुका पंचायत समिती गण विजयी उमेदवार खालील प्रमाणे
करमाळा तालुका विकास आघाडी विजय उमेदवार जेऊर गण सौ ललिता शिरसकर, उमरट गन आदिती पाटील केम गन ज्ञानेश्वर बचत कर पांडेगण स्वप्नील काळे
भारतीय जनता पार्टी
पंचायत समिती विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सौ पूजा ढेरे वीट गन, सौ संध्या कांबळे रावगाव गन, श्री नाना झाकणे कोटी गन, सोनाली तकीक वांगी गण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पंचायत समिती विजयी उमेदवार खालील प्रमाणे,,,,
भरत औताडे हिसरे गण, एडवोकेट आजिनाथ विघ्ने केतुर गण, दशरथ घाडगे साडे गण, सौ रत्नमाला सरडे चिकलठाण गण
करमाळा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या आज तहसील कार्यालय शेजारी झालेल्या शासकीय धान्य गोदामा मध्ये शांततेच्या वातावरणात मतमोजणी प्रक्रिया पार पडली करमाळा शहर तसेच तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
चौकट
पत्रकार कक्ष मात्र फक्त नावालाच
करमाळा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या शासकीय गोडाऊन समोर पत्रकारासाठी खास मतदानाची आकडेवारी देण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला होता मात्र या कक्षामध्ये पत्रकारांना वेळोवेळी अधिकाऱ्याकडून माहिती दिली जात नव्हती उलट पणे प्रत्येक गटनिहाय आकडेवारी अगोदर तालुक्यामध्ये जात होती नंतर पत्रकारांना सदरची माहिती उशिरा कळत होती शासकीय यंत्रणा मात्र अशा पद्धतीने मंद गतीची होती याचा करमाळा तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून सदरच्या शासकीय यंत्रणे बाबत आपली नाराजी व्यक्त केली
----------------------+--------------------
वीट गट -आश्विनी चिवटे (भाजपा) -14736
पांडे गट -रश्मी बागल (भाजपा)-9247
कोर्टी गट -वनिता गुळवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)-13372
चिखलठाण गट -प्रशांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)-9739
केम गट -कल्याणी तळेकर (तालुका विकास आघाडी)-10662
वांगी गट- रुपाली गोडसे (तालुका विकास आघाडी)-10314
*पंचायत समिती गण विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते*
रावगाव गण -संध्या कांबळे (भाजपा)-4553
वीट गण -पुजा ढेरे (भाजपा)-5340
कोर्टी गण -नाना झाकणे (भाजपा)-5361
वांगी गण -सोनाली ताकिक (भाजप)-5167
हिसरे गण -भरत आवताडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)5938
केतुर गण- अजिनाथ विघ्ने (राष्ट्रवादी कॉंग्रेस)-6434
चिखलठाण गण -वनमाला सरडे (राष्ट्रवादी काँग्रेस)-4875
साडे गण- दशरथ घाडगे (राष्ट्रवादी काँग्रेस)-4933
पांडे गण- स्वप्नील काळे (तालुका विकास आघाडी)-4036
उमरड गण -आदिती पाटील (तालुका विकास आघाडी)-6231
केम गण- ज्ञानेश्वर बिचितकर (तालुका विकास आघाडी)-5463
जेऊर गण -ललिता शिरस्कर (तालुका विकास आघाडी)-5656




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा