*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक वय वर्ष 56 यांना आज पाच हजाराची लाच घेताना पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे सभा मंडपाचे काम घेतले होते ते पूर्ण केले होते केल्यानंतर सदरचे बिल सोलापूर कार्यालयाकडे दाखल केले होते सदरचे बिल सोलापूर येथून माळशिरस पंचायत समिती कार्यालयाकडे आल्यानंतर काम झाल्याचा दाखला गटविकास अधिकारी यांच्याकडून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रार दाराकडे दहा हजार रुपयाची मागणी केली होती या बाबत तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार आज पंचायत समिती कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास तडजोडी अंती दाखला देण्यासाठी पाच हजाराची रक्कम स्वीकारताना नागटिळक यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले या प्रकरणात गटविकास अधिकारी यांची पडताळणी केली असता त्या पडताळणीत काहीही आढळून आले नाही आरोपी विरोधात सोलापूर लाचलुजपत प्रतिबंधक विभागाकडे सदरचा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे
सदरची कारवाई पुणे लाचलितपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे रेबीज पोलीस कॉन्स्टेबल माकर पोलीस कॉन्स्टेबल तावरे कुमकर व चालक दिवेकर यांनी केली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा