*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शंकरनगर (ता.माळशिरस) येथे श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट व मराठी साहित्य परिषद शाखा अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जयसिंगराव पवार,डॉ.सदानंद देशमुख व कवी नारायण सुमंत यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदन करण्यात आले.
शंकरनगर येथील उदय सभागृहात संपन्न झालेल्या या साहित्य पुरस्कार वितरणाप्रसंगी अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील,स्वरुपाराणी मोहिते- पाटील,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, विश्वस्त नितीन खराडे,चंद्रकांत कुंभार,डॉ.विश्वनाथ आवाड,श्रीकांत राऊत,राजेंद्र काकडे,शहेनाज शेख,वसुंधरा देवडीकर यांच्यासह साहित्यप्रेमी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते
प्रारंभी प्रास्ताविकात स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे परिचय करुन देत अकलुज कला,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहे. साहित्य क्षेत्रात बिजारोपणासाठी साहित्य पुरस्कार प्रदानाच्या उद्देश असुन गेली ४ वर्षापासून साहित्त्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कारा देऊन गौरविण्यात येत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त नारायण सुमंत,डॉ.सदानंद देशमुख व डॉ.जयसिंगराव पवार यांच्या वतीने पुरस्कार स्विकारणा-या आसावरी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक सुर्यवंशी यांनी केले तर आभार रोहित देशमुख यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा