मुख्यसंपादक
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-94215777448
9730867448
पुरंदावडे गावचे सुपुत्र शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी यांना दिल्ली येथील विश्व संस्कृती एवम पर्यावरण संरक्षण आयोग यांच्यातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमा च्या प्रमुख अतिथी डॉक्टर ईशा अग्रवाल मिस इंडिया 2015 या होत्या त्यांच्या हस्ते कुलकर्णी यांना पदवी प्रदान करण्यात आली कुलकर्णी हे 36 वर्षापासून अकलूजच्या शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धवल नगर यशवंत नगर येथे हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन हिंदी शिक्षक संघ सोलापूर यांचा हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे अतुल्य भारत पुरस्कार, बाँड समाज रत्न पुरस्कार, आदर्श रत्न सन्मान पुरस्कार, भारतरत्न सन्मान पुरस्कार, मुंशी प्रेमचंद विद्यावाचस्पती उपाधी, शिक्षक नायक सन्मान, युनिव्हर्सल ह्युमन डिग्ग्निटी अवॉर्ड, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय अवार्ड, रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय अवार्ड, मदर टेरेसा बुक ऑफ इंडिया प्राइड इंटरनॅशनल अवॉर्ड, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल प्राईड याची वर्स अवॉर्ड, महात्मा गांधी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड, गौतम बुद्ध इंटरनॅशनल रिलीजन्स अवॉर्ड अशा प्रकारचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हिंदीमध्ये लिखाण करून हिंदीचा प्रचार प्रसार केला आहे हिंदी तज्ञ शिक्षक म्हणून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे अनेक विद्यालयामध्ये पर्यावरण व हिंदी विषय याविषयी व्याख्याने दिली आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे यापूर्वी त्यांना आदर्श हिंदी शिक्षक तसेच रोटरी क्लब चा राष्ट्र निर्माण पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील अध्यक्षा शितल देवी मोहिते पाटील प्राचार्य अल्बर्ट थरकन प्राचार्या बिनो के पावलस व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीअभिनंदन करून त्यांनाशुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा