*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा मतदार संघातील दळणवळण समस्या सोडवण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीतीमध्ये जेऊर या.करमाळा येथे शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला करमाळा आगार प्रमुख श्री विरेंद्र होनराव व कुर्डुवाडी आगार प्रमुख श्री. रत्नाकर लाड हे व करमाळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री नितीन कदम उपस्थित राहणार आहेत. करमाळा मतदार संघातील खाजगी शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे काही प्रतिनिधी यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले गेले आहे. करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांची सध्या प्रवासासाठी गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी व शालेय विद्यार्थ्यांना केवळ प्रवासाचे साधन वेळेवर उपलब्ध करून दिले जात नसल्याने होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात आमदार नारायण आबा पाटील यांनी आढावा बैठकीतून प्रत्यक्षात या तक्रारी जाणुन त्यावर उपाययोजना करावयाचे ठरवले असल्यानेच ही बैठक घेतली जात आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा आगारास दहा नवीन बसेस तसेच कुर्डुवाडी आगारास दहा नवीन बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. करमाळा मतदार संघातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी आणखी नवीन एसटी गाड्यांची मागणीही केलेली आहे. तसेच करमाळा व कुर्डुवाडी आगारांचे नुतणीकरण व जेऊर बसस्थानक नुतनीकरण कामासाठी निधीही उपलब्ध करुन दिला् यातील करमाळा आगाराचे नुतनीकरण मागेच केले गेले तर जेऊर नवीन बसस्थानक काम वेगात सुरू आहे. सध्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याच्या कारणावरून शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागते. तर काही ठिकाणी एस टी बस वेळेवर येत नसून खुप उशीरा धावत असल्याचे पालकांनी सांगितले आहे. दहावी व बारावीच्या वार्षिक परिक्षा चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाचे साधन उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. तसेच करमाळा बस स्थानकाहुन पुणे मुंबई येथे जाणाऱ्या काही गाड्या बंद झाल्याने याचा गंभीर परिणाम नागरिक व व्यापार पेठेवर होत आहे. या सर्व अडचणीच्या पार्श्वभूमीवर शनीवारी जेऊर येथील आमदार कार्यालयात दुपारी बारा वाजता होत असलेल्या बैठकीत प्रवाशी व पालक तसेच शैक्षणिक संस्था चालक यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा