Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

*म्हैसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळेस सेवा भारतीच्या वतीने मदत..!*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448/*

*9421577488*




जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा म्हैसगाव मुले या शाळेत सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र, भागेश्वर निवास सदाशिव पेठ, पुणे यांच्यावतीने मुला- मुलींसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाचे भूमिपूजन सोहळा सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मा. कादर शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सेवा भारतीचे प्रदीप सबनीस सचिव सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र, प्रवीण देशपांडे सहसचिव सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र, सदानंद कुलकर्णी पुणे सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र सामाजिक आयाम प्रमुख, सुधीर जवळेकर कोषाध्यक्ष सेवा भारती, किरण चव्हाण सचिव पंढरपूर जिल्हा, अण्णा टकले जिल्हा कार्यवाह पंढरपूर, डॉ. श्रीराम परदेशी संघचालक, सहकार्यवाह प्रवीण गायकवाड तसेच म्हैसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मा. मुकुंद उबाळे, जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. शिवाजी भाऊ पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनुसिंग राजपूत, माजी अध्यक्ष सौदागर जगताप, सदस्य प्रवीण कांबळे, विनोद कांबळे, अक्रोळ जगताप, राजेंद्र गोडगे, शिक्षण विस्तार अधिकारी- स्वामी मॅडम ,केंद्रप्रमुख भोसले सर, विशेष शिक्षक- कसबे सर, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक -मनोज गादेकर सर आदी मान्यवरउपस्थित होते.




        या सेवा भारती संस्थेने शाळेस या अगोदरही 205 विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, लेखणी इत्यादी शैक्षणिक साहित्य दिलेले आहे. यानंतर आज मुला मुलींचे व कर्मचाऱ्यांचे स्वच्छतागृह या दोन्ही कामाचे उद्घाटन सेवाभारतीचे सर्व पदाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. कादर शेख साहेब व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केंद्र शाळेचे मुख्याध्यापक हुसेन बारस्कर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी मा. कादर शेख साहेब , सेवाभारतीचे प्रदीपजी सबनीस व जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले केंद्रशाळेचे मुख्याध्यापक हुसेन बारसकर यांनी सेवा भारती पदाधिकारी व उपस्थित सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्रीमती प्रविणा कांदे मॅडम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा