Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

पराभवाने खचून न जाता मोठ्या हिमतीने पुनश्च काम करणार,,,,,,, हिसरे गणातील उमेदवार पैलवान दत्तात्रय जगदाळे

 

*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



नुकत्याच संपन्न झालेल्या करमाळा तालुका पंचायत समितीच्या हिसरे गणातून मी आमचे नेते आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून मी निवडणुकीकरिता उभा होतो मला माझ्या मतदारसंघातील असंख्य मतदारांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकून मला मत रुपी आशीर्वाद दिले त्या सर्वांचा मी ऋणी राहील असे जगदाळे म्हणाले

राजकीय गट तट सोडून सगळ्या युवा सहकार्याने माझ्या  पाठीमागे अतिशय खंबीर पणे उभे राहिले. कोणते ही राजकीय पेच माहिती नसताना,जास्त प्रमाणात अनुभव नसताना, हिसरे गणातील गावागावातून अनेकांनी मला उमेदवारी मिळावी यासाठी माझी शिफारस केली 

आमचे नेते तसेच करमाळा तालुका विकास आघाडीचे नेतृत्व करणारे पाणीदार माननीय आमदार नारायण आबा पाटील साहेबांनी विश्वास ठेऊन मला हिसरे गणातून उमेदवारी दिली  माझ्या युवा मित्रांनी मला चांगली साथ दिली. आम्ही हिसरे गणातून हरलो तरीही पराभवाने खचून न जाता मोठ्या ताकदीने आम्ही कार्य करीत राहणार असल्याचे जगदाळे यांनी बोलताना सांगितले आमचा पराभव झाला असला तरी आजही आम्ही नाराज नाही उलट पणे हिसरे गणातील सर्वसामान्य तसेच शेतकरी बांधवांचे आम्ही काम करीत राहणार असे जगदाळे म्हणाले.

 हार से ही जीत की सुरुवात होती है... इथून पुढे गावागावातून युवा सहकारी सोबत घेऊन गोरगरिबांची सेवा आपण करणार आहोत.. राजकारण डोक्यात ठेवलं तर समाजकारण करता येत नाही.. आज जनतेने आपल्याला जो कौल दिला तो आपणास मान्य असून यापुढं कुठं कमी पडलो असेल त्यात सुधारणा करण्याचा आपण नक्की प्रेयत्न करणार आहोत. मला माझ्या हिसरे गणातून असंख्य कार्यकर्ते तसेच हितचिंतक मित्रपरिवार मतदार राजा यांनी सर्वांनी मिळून मला जे सहकार्य केले ते मी भविष्यात कधीही विसरू शकणार नाही त्या सर्वांचे मी माझ्या मनापासून आभार मानतो असे श्री जगदाळे शेवटी बोलताना म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा