Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

करमाळा नगरपालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी कर थकित दंड व्याज माफिचा ठराव त्वरीत घ्यावा ...संजय (बापु) घोलप

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा शहरातील सर्व मालमत्ताधारकांचे थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीकर बील यावरील व्याज / शास्ती पूर्ण माफ करण्यासाठी संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांची पत्राद्वारे मागणी 

महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्र.एमयुएम -2025/प्र.क्र.70/नवि-17 दि.19 मे 2025.




  करमाळा शहरातील सर्व मालमत्ताधारकांचे थकीत व चालू मालमत्ता कर व पाणीपट्टीकर बील यावर आकरण्यात येणारी शास्ती / व्याज संदर्भीय शासन निर्णयान्वये पूर्ण माफ करणे बाबत शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.

सदर शासन निर्णयाची सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी नगरपरिषदेने अंमलबजावणी केलेली आहे. बार्शी नगरपरिषदेने मे.सभेमध्ये मंजूरी घेवून जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याप्रमाणे शहरातील सर्व सामान्यनागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. व नगरपरिषदेची थकबाकी देखील वसुल होणार आहे या कारणांचा विचार करुन करमाळा नगरपरिषदेच्या मे.सभेमध्ये करमाळा शहरातील सर्व मालमत्ताधारकांचे थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीकर बील यावरील व्याज / शास्ती पूर्ण माफ करणे बाबत मे.सभेची मंजूरी घेवून प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने करण्यात येत आहे मागणी संदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा