*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
- पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील विशाल वर्धमान बोडके यांची पहिल्या प्रयत्नात कृषी मंडल अधिकारी पदावर निवड झाली आहे. गावातील युवकाची कृषी अधिकारी पदावर निवड झाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशाल बोडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा २०२४ परीक्षेत राज्यात ९५ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. लेखी परीक्षेत ४०० पैकी २८५ गुण मिळवले. तर मुलाखती मध्ये ५० पैकी २८ गुण मिळवत कृषी मंडल अधिकारी पदावर विशाल वर्धमान बोडके याची निवड झाली आहे.
विशाल बोडके यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरी बुद्रुक
येथे माध्यमिक शिक्षण जिजामाता माध्यमिक विद्यालय सराटी, सुरवातीचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बावडा येथे झाले. तर २०१७ ते २०२१ दरम्यान रत्नाइ कृषी महाविद्यालय, अकलूज येथे पदवीचे शिक्षण घेतले. तर २०२१ ते २०२३ दरम्यान पदव्युत्तर पदवी (एमएससी अग्री) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथून वनस्पती रोगशास्त्र विषयात प्राप्त केली आहे.
विशाल वर्धमान बोडके बोलताना म्हणाले, वडील पोलिस पाटील म्हणून शासनाची सेवा करताना जवळून पाहिले आहे. त्यामुळे शासकीय सेवेत अधिकारी होवून जाऊन पिंपरी बुद्रुक ग्रामस्थ, तालुका व जिल्ह्याची सेवा करण्याचा मानस धरत प्रयत्न केला त्यामध्ये यश आले. एवढ्यावर न थांबता तालुका व जिल्हा कृषी अधिकारी होण्याचा मानस आहे. शिक्षक, मित्र, वडील, आई, आजी, आजोबा, चुलता, चुलती व भाऊ यांनी याकामात मला प्रेरणा मिळाल्याने यश मिळाले आहे.
फोटो - विशाल वर्धमान बोडके.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा