*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राजमाता अहिल्याबाई होळकर माता जिजाऊ यासारख्या महापुरुषांची पुतळे व स्मारके उभा करण्यासाठी ना हरकत दाखला
व पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावी तसा कायदा उन्हाळी अधिवेशनात करावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे
महापुरुषांचे पुतळे स्मारके आपल्या गावात आपल्या शहरात उभे राहावी अशी भावना प्रत्येक नागरिकाचे असते
मात्र केवळ महाराष्ट्रातच महापुरुषांचे पुतळे स्मारक उभा करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते
हे अन्यायकारक आहे
करमाळा तालुक्यात 118 खेडी गावी असून या प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा ही भावना शिवभक्तांचे आहे
या पुतळ्याचे संवर्धन जतन व सुरक्षा करण्याचे काम शिवप्रेमी करायला तयार आहेत
इतर राज्यात राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभा करण्याचे अधिकार ग्रामपंचायत
नगरपालिका
महानगरपालिका यांना आहे
------
राज्यातील अनेक समाजसेवी संस्था स्वखर्चातून राष्ट्र पुरुषांचे पुतळे स्मारके स्वनिधी उभा करण्यास तयार आहेत
अशा स्मारकामुळे
यामुळे आपला इतिहास येणाऱ्या नवीन पिढीला माहिती होईल यासाठी तात्काळ शासनाने या अधिवेशनातच निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा