Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

महाराष्ट्राचा अभिजीत पाटील — राजस्थानचा सर्वात तरुण IPS अधिकारी, वय फक्त २२… पण जबाबदारी अख्ख्या जिल्ह्याची*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर संयम, चिकाटी आणि आत्मविश्वासाची अंतिम कसोटी!

अनेक उमेदवार वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही अपयशी ठरतात…

मात्र महाराष्ट्राच्या ठाण्याचा अभिजीत पाटील याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, पहिल्याच प्रयत्नात ही कठीण परीक्षा जिंकून दाखवली आहे! 

पहिल्याच प्रयत्नात ऐतिहासिक यश

अभिजीत पाटील याने UPSC CSE 2022 मध्ये अखिल भारतीय 470 वी रँक मिळवली.

विशेष बाब म्हणजे — कोणतेही कोचिंग क्लास न लावता, केवळ स्व-अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले! 

2023 बॅचचा IPS अधिकारी म्हणून तो आज राजस्थान कॅडरचा सर्वात तरुण IPS अधिकारी ठरला आहे.

सध्या तो राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील राजगड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून कर्तव्य बजावत आहे.श

 महाराष्ट्राची माती, देशसेवेची जिद्दश

अभिजीतचा जन्म 11 जून 1999 रोजी ठाणे येथे झाला.

वडील तुळशीराम पाटील — मुंबई महानगरपालिकेतून मुख्य लेखापरीक्षक म्हणून निवृत्त

आई आशा देवी — सिंचन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी

दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेला अभिजीत, संस्कार, शिस्त आणि मेहनतीच्या मूल्यांवर घडलेला तरुण आहे.श

कोवळा चेहरा… पण पोलादी आत्मविश्वास

कोवळा चेहरा आणि लहान वय पाहून अनेकांना आजही आश्चर्य वाटते,

पण वर्दीतील आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि कर्तव्यनिष्ठा पाहिल्यावर शंका आपोआप नाहीशा होतात.

इतक्या कमी वयात कायदा व सुव्यवस्था सांभाळत, अभिजीत पाटील तरुणांसाठी एक जिवंत प्रेरणा ठरत आहे.श

देशातील सर्वात तरुण IPS अधिकाऱ्यांमध्ये सफीन हसन यांच्यासोबत आज

अभिजीत पाटील यांचेही नाव अभिमानाने घेतले जाते! श

स्वप्न मोठं ठेवा… वय कधीच अडथळा ठरत नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा