उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
“आय चॅम्प अबॅकस”चा भव्य पारितोषिक वितरण सोहळा ८ फेब्रुवारी रोजी अकलूज स्मृतिभवन येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती, मा. सौ.शीतल देवी धैर्यशील मोहिते पाटील अध्यक्ष शिवरत्न शिक्षण संस्था, डॉटर मॉम फाऊंडेशन ,मा.स्वरूप राणी मोहिते पाटील अध्यक्ष प्रताप क्रीडा मंडळ, मा श्री दत्तात्रय अच्युतराव सावंत माजी शिक्षक आमदार पुणे, मा. सयाजिराजे संग्रामसिंह मोहिते पाटील नगर सेवक अकलूज नगर परिषद अनेक शाळांचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक यांच्या उपस्थितीत हा भव्य पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार
.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या “आय चॅम्प अबॅकस” संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी भव्य पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे., या कार्यक्रमात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ८ सायकल १० स्मार्ट वॉच तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक ४५८ विद्यार्थ्याला सन्मानचिन्हे ,मेडल व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, गणनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजक विशाल माने व स्नेहल माने यांनी सांगितले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा