*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या महानंदा मुकुंद डोंगरे यांच्यासह मंगरुळ गण व आरळी गणातील भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुंकुद डोंगरे यांचा झंझावाती प्रचार सुरु आहे. त्यास मतदारांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गटात व गणात भाजपाचे कमळ फुलणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे
भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार महानंदा मुंकुद डांगरे आहेत. त्यांच्याकडूनही घरोघरी जावून गावातील लहानथोर
घेत आहेत. प्रत्येक गावात त्यांना नागरिकांचा मोठा पाठींबा मिळत आहे. तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा त्यांना निश्चित फायदा होणार आहे. तसेच युवा नेते सुनिल चव्हाण यांचादेखील या मतदार संघात जनसंपर्क मोठ
आहे. तेही स्वतः मतदार संघात गाठी भेटी घेत फिरत आहेत. मुंकुदा डोंगरे यांनी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राहिले आहेत. त्यामुळे त्यांना विकास कामाचा चांगला अनुभव आहे. तसेच त्यांचा हा पारंपारीक मतदार संघ आहे. याच मतदार संघातून, त्यांनी दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व केले आहे. या मतदार संघात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. या गटातील प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरात त्यांची ओळख आहे. आणि या सर्वांच्या फायदा उमेदवारांना मिळत आहे. युवा नेते मल्हार पाटील हे स्वतः लक्ष देवून आहेत. त्यामुळे महानंदा डोगरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 जि,प गट.क्र.३८ मंगरूळ अधिकृत उमेदवार सौ. महानंदा मुकुंद दादा डोंगरे व आरळी पंचायत समिती 76. चे अधिकृत उमेदवार श्री. नवनाथ आगतराव मारकड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मुकुंद डोंगरे यांनी केले आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा