*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९*
इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आरशाद सय्यद व मित्र परिवाराच्या वतीने
पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सामाजिक सलोखा आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी इंदापूर येथे भव्य 'रोजा इफ्तार' पार्टीचे आयोजन नगराध्यक्ष भरत शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भरत शहा म्हणाले, रोजा इफ्तार सारखे उपक्रम समाजात एकता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव संवर्धित होतो. रमजानचा महिना आपल्याला संयम, त्याग आणि मानवतेची शिकवण देतो."
यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी
उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक प्रशांत उंबरे, अजिंक्य जावीर, भारत शिंदे, स्वप्नील राऊत, पोपट शिंदे, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, श्रीनिवास माने, रितेश जगताप, गणेश महाजन, प्रवीण हरनावळ, अमोल माने, प्रमोद राऊत, रियाज बागवान, फिरोज पठाण, नजिर बागवान, असिफ बागवान, रिहान बागवान, रूहान बागवान, आहाद बागवान, फारूक काझी, जावेद शिकिलकर, प्रा.अशोक मखरे, आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, राष्ट्रवादीचे नेते संदीपान कडवळे, आरपीआय बारामती लोकसभा प्रमुख बाळासाहेब सरवदे, नगरसेवक प्रतिनिधी अनिल ढावरे, गटनेते शकीलभाई सय्यद यांच्यासह समाजातील विविध स्तरांतील नागरिक,
मित्रपरिवार आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
इफ्तारच्या वेळी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे रोजा सोडला.
आयोजक आरशाद सय्यद यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा