*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९*
शहा ग्लोबल स्कूल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमातून दिला महिला
येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. महिला सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि समाजातील महिलांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. शाळेच्या व्यवस्थापनातील अंकिता शहा, वैशाली शहा आणि रुचिरा शहा
विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या सुंदर आणि आकर्षक नृत्य सादरीकरणाने झाली. मुलींच्या मनमोहक अदाकारीने व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी प्रमुख पाहुण्या तथा निर्भया संस्थेच्या सदस्या अॅडव्होकेट समृद्धी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी अॅड. समृद्धी पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. महिलांना समाजात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या खांद्यावर असलेल्या अनेक जबाबदाऱ्या आणि त्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना महिलांनी दाखवलेली जिद्द व सामर्थ्य याबद्दल त्यांनी प्रभावीपणे विचार मांडले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे आणि समाजाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली.
कार्यक्रमात अनेक पालकांनी उत्साहाने आपले विचार व्यक्त केले तसेच आपले विविध कलागुण सादर केले. या कार्यक्रमामुळे सर्व मातांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ मिळाले. उपस्थित महिलांनी आनंदाने आणि आत्मविश्वासाने सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
या प्रसंगी “ आम्ही इंदापूरकर ” या सोशल मीडिया पेजच्या कंटेंट क्रिएटर गायत्री सूर्यवंशी, आश्लेषा गुंडेकर, मोहिनी शिंदे आणि साधना मेणसे यांनी कविता व कथा सादर करून कार्यक्रमाला साहित्यिक रंग दिला. अमृता काळे यांनी गिटार वादन करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच नलवडे मॅडम आणि शुक्ला मॅडम यांनी लोरी व गाणी सादर करून कार्यक्रमाची गोडी वाढवली. धरुरकर मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल सांगत उपस्थितांना प्रेरणा दिली. ज्योत्स्ना होळकुंडे यांनी जीवनातील आनंद व सकारात्मकतेबद्दल आपले विचार मांडले. करिश्मा बालगुंनवरे मॅडम यांनी गाणे सादर केले.
याशिवाय तेजल देओलिकर, प्रियांका मोरे, अमृता नलवडे, वैशाली शेंडे, शुभांगी मोदी यांनीही महिलांच्या भूमिकेबद्दल आपले विचार व्यक्त करत कार्यक्रमात मोलाची भर घातली.
महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत तसेच विद्यार्थिनींच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देत महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा