Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ मार्च, २०२६

करमाळा शहरातील सहा वर्षे मोईन बागवान या चिमुकल्याने केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा रोजा पूर्ण

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा शहरातील करमाळा पुणे मार्गावरील बागवान नगर येथील मोईन राजू बागवान या सहा वर्षाच्या चिमुकल्याने रमजान महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास दिवसभर अन्न,पाणी वर्ज्य करून १४ तास कडक उपवास करतात असाच महत्त्वाचा उपवास मोईन बागवान या चिमुकलयाने केला 

मोईन याने कमी वयामध्ये कडक असा उपवास यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपवासाच्या वेळेस त्याला नवीन कपडे पुष्पहार घालून त्याचा सत्कार करण्यात आला इस्लाम धर्माच्या रितीरिवाजा नुसार त्याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मुस्लिम धर्मियांमधून विशेष अभिनंदन होत आहे 

त्याने सदरचा एक दिवसाचा रोजा पुणे रोडवरील असणाऱ्या आराफात मशिदीमध्ये उपवास सोडला यावेळी मौलाना ईकराम बागवान, सहित बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

करमाळा येथील प्रसिद्ध असे फळ विक्रेते पाच भाई फ्रुट स्टॉलचे चालक राजू हाजी मोहम्मद शरीफ बागवान यांचा तो मुलगा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा