डॉ सलीम सिकंदर शेख.
श्रीरामपूर
जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )
मोबाईल :- 9271640014
# THE WORLD IS ONE FAMILY #
दिव्य कुरआन म्हणते कीं, "लोकांनो ! आम्ही तुम्हाला ( सर्वाना ) एक नर ( पुरुष ) व एक नारी ( स्त्री ) पासून निर्माण केले आहेत , मग तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे यासाठी , तुमच्या विविध वंश जाती व काबिले बनवले , परुंतु अल्लाह ( ईश्वर, परमेश्वरच्या ) च्या नजरेत तोच सर्वाधिक सन्माननीय ( प्रतिष्ठित ' श्रेष्ठ , सन्माननीय ) असणार आहेत , जो चारित्र्य संपन्न ( चरित्र्याने श्रेष्ठ ) असणारा आहेत किंवा असावा. (दिव्य कुरआन पारा नं :- 26 वा, सुरह नं 49 वा, सुरह अल - हुजूरात आ. नं. 13 वी ).
जागतिक फुटबॉल संघटना फिफा नें फुटबॉल विश्व कप अजिंक्य पद स्पर्धा 2022 चे आयोजन 22 नोव्हेंबर 2022 रोजी अरेबीयन द्विप कल्पातील - " दोहा - कतार -" या देशात आयोजित केले होतें, " अल - खोर " या शहरातील " अल - बयान " नावाच्या स्टेडियम मध्ये उदघाट्न समारंभाचे आयोजन अतिशय वेगळ्याच पद्धतीने ठेवलं होतं, त्यामध्ये अतिशय वेगळ्याच पद्धतीचा संदेश देवून संपन्न झाला, उदघाट्नामध्ये अमेरिकेच्या हॉलिवूड फिल्म स्टार मॉर्गन फ्रीमेन ला दोहा कतार नें फिफा वर्ल्ड कप चा ब्रँड अबेसेडर ( Brand Ambasador -राजदूत ) करून त्याबरोबरच दोहा कतर चाच ज्याला जन्मापासूनच - जन्मजात कॉउडल रेग्रेशन सिनड्रॉम ( स्पिनल कॉर्ड ) अर्थातच मेदूरज्जा चा अति दुर्मिळ आजाराने ट्रस्थ ज्यामध्ये कमरे पासून खाली बारीक बारीक पाय व वरील सर्व शरीर नॉर्मल अशा विचित्र आजार असलेल्या व्यक्ती - घाणीम - अल - मुफ्ताह ला सह राजदूत ( co brand ambasador )बनवलं.
अर्थात असा हा सशक्त लोकांनी खेळायचा हा खेळ प्रकार पळू पळू दमछाक घामाघूम शारीरिक कसोटी घेणारा हा खेळ प्रकार परुंतु त्यातूनच सर्व जगाला एक संदेश देण्यासाठी असा विचित्र विकृत आजाराने त्रस्त असलेल्याला जाणूनबुजून ब्रँड आंबेसेटर केलं..
याच दोहा कतर च्या फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेत कोणत्याही खेळाडू किंवा तत्सम लोकांना दारू भेटणार नाहीत. अर्थातच संपूर्ण दारू बंदी आदेश.
म्हणून फूटबॉल खेळाची आवड असलेल्या जगातील बहुतेक देशातील प्रामुख्याने प्रमुखांचा या सर्व गोष्टीना तीव्र विरोध.
जगातील 200 देशात 500- च्या हीं अधिक संख्येने अंतराष्ट्रीय टीव्ही चॅनेलमध्ये कोटींच्या संख्येत याच देही याच डोळ्यांनी लाईव्ह प्रक्षेपण विविध जातींच्या फुटबॉल प्रेमि समोर " दिव्य कुरआन "च्या सुरहा हुजूरात च्या नंबर 13 च्या स्लोक आयतीचे सर्व जगासमोर लाईव्ह हाफिज घानिम अल मिफ्ताही व हॉलिवूड स्टार मॉर्गन फ्रीमन नी मोठ मोठया आवाजात उदघोष करीत वाचून उदघाट्न केले.
अखिल मानवजातीला उद्देशून सृष्टीच्या निर्माण कर्ता अल्लाह ( ईश्वर ) नें तीन महत्वाचे तात्विक विवेचन केलेलं आहेत,महत्वाचं संदेश जगासाठी दिला आहेत.
जगात विविध ठिकाणी विश्वव्यापी उपद्रव चालू आहेतत म्हणून त्यास शांत करण्यासाठी संयोजकांनी अल्लाह ( परमेश्वर ) चा विश्व शांती चा " सर्व धर्म समतेचा " विश्वव्यापी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहेत.
त्या संदेशातील तीन तात्विक मुद्दे, (1)तुम्हा सर्वांचे मूळ एकच आहेत, तुम्हाला एकाच स्त्री व एकाच पुरुष पासून तुमची निर्मिती - वंश अस्तित्वात आला आहे व आज जगात तुमचे जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे एकाच आई - वडिलांपासून त्यांचा प्रारंभ झालेला होता, त्यांच एका वंशाच्या शाखा आहेत.
(2) मूळ स्वरूपाच्या दृष्टीने एकच असताना देखील तुमचे राष्ट्र आणि जाती व कुळात विभागलं जाणे स्वाभिवकच होते, परुंतु, या भिन्नता - विविधतेची निवड कदापी ही अशी नव्हते कीं , त्याच्या आधारावर उच्च- निच्च - कनिष्ठ - श्रेष्ठ, स्पृश - अस्पृश्य असले भेदभाव केले जावे , एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठव गजवावे , एका वर्णच्या लोकांनी दुसऱ्या वर्णच्या लोकांना तुछ समजावं , एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर हुकमत गजवावी. निर्माण कर्त्या अल्लाह नें ज्या कारणास्तव मानवी समूहाना राष्ट्र व वंशाच्या स्वरूपात उभारले ते केवळ इतकेच कीं त्यांच्या परस्पर दरम्यान सहकार्य व ओळखिची ही स्वाभाविक खून (चिन्ह, सिम्बॉल,दिशादर्शक ) होती.
(3) तिसरं म्हणजे, या माणसा दरम्यान श्रेष्ठ -उच्च- सन्माननीय व्यक्ती अल्लाह जवळ जो कोणी प्राप्त असेल तर तो फक्त्त नैतिकता व नीतिमत्ता व उच्च मुल्लय व दर्जा साठी झटणाऱ्या व्यक्ती. आणि, तेच अल्लाह जवळ सर्व श्रेष्ठ असणारे आहेत.
येवढ्या मोठया जागतिक पातळीवरील मंचावर एका पाय नसलेल्या हाफिज घानिम -अल - मुफ्ताह नें पवित्र दिव्य कुरआन मधील " सुरहा हुजूरात " या जगतिक " एकता अखंडते - बंधूभाव " चा संदेश- असलेल्या स्लोक (आयात )चे फुटबॉल विश्व कप अजिंक्य स्पर्धा मध्ये सर्व जगाला -विश्वाला फक्त्त एकच संदेश द्यायांचा होता कीं " संपूर्ण जग हें एकच आहेत -- एकाच स्त्री व एकाच पुरुष ची निर्मिती आहेत ,, " आप आपसात - भेदाभेद करू नका.
अर्थातच :- " वसूदैव कुटुंबं कम - वसूधैव कुटुंबं कम "
" THE WORLD IS ONE FAMILY "
." वसूदैव कुटुंबंकम " हें संस्कृत चे सूत्र आहेत,
त्याचा अर्थ हा सर्व " जग हा एकच परिवार आहेत,"
" संपूर्ण धरती ही परिवार आहेत "...
पवित्र दिव्य कुरआन मध्ये असंख्य आयतींमध्ये सांगितलेला " जागतिक शांती - समता - एकात्मता- अखंडता "
(मित्रांनो लेख आवडल्यास मित्र व नातेवाईकांना अवश्य पाठवावे, त्यांना ही फायदा होईल.. प्रतिक्रिया अवश्य कळवा )
लेखन :- डॉक्टर सलीम शाईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर जिल्हा :- अहमदनगर
मोबाईल :- 9271640014





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा