*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1962 मधील नियम 59 (3), 67, 68
2) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जिपनि-2026/प्र.क्र.25/पं.रा.2
महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक शाखा यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2026 सभापती व उपसभापती निवडीकरीता अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्य असून त्या संदर्भात सर्व आध्यासी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीबाबत आदेश देण्यात आले आहे
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ६७ व ६८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कुमार आशीर्वाद, भा.प्र.से., जिल्हाधिकारी सोलापूर याद्वारे खाली नमुद केलेल्या तालुक्यासाठी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड करणेकामी अध्यासी अधिकारी म्हणून खालील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.
*तालुका व नियुक्त अध्यासी अधिकारी त्यांचे नाव व पदनाम*
१) करमाळा--सुशांत बनसोडे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर
२)माढा--श्रीमती जयश्री आव्हाड उपविभागीय अधिकारी ,माढा विभाग कुर्डूवाडी
३) बार्शी---अमोल सिंह भोसले उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १ सोलापूर
४) उत्तर सोलापूर---सदाशिव पडदुणे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक १ सोलापूर
५) मोहोळ-- श्रीमती सीमा होळकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक:- ७ सोलापूर
६) पंढरपूर---सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर
७) माळशिरस--श्रीमती विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग
८) सांगोला---भैरप्पा माळी उपविभागीय ,अधिकारी मंगळवेढा विभाग
९) मंगळवेढा----संतोष कुमार देशमुख उप जिल्हाधिकारी भू संपादन क्रमांक ३ सोलापूर
१०) दक्षिण सोलापूर---श्रीमती अंजली मरोड उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना सोलापूर
११) अक्कलकोट---सुधीर शिंदे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक २ सोलापूर
संबंधित पिठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जिपनि-2026/प्र.क्र.25/पं.रा.2 दिनांक 25/02/2026 मध्ये दिलेल्या सुचनेनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील नियम 67, 68 अन्वये सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रीया दिनांक 12/03/2026 रोजी पार पडण्याचे पत्राद्वारे आदेश देण्यात आले आहे
(कुमार आशीर्वाद, भा.प्र.से.) जिल्हाधिकारी सोलामपूर





Nice
उत्तर द्याहटवा