*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९*
योग म्हणजे केवळ व्यायाम नसून ती जगण्याची शिस्तबद्ध कला आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन व निरोगी भविष्य दडलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीर, मन आणि बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक आहे असे प्रतिपादन पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केन्द्रीय प्रभारी प. पू. स्वामी परमार्थदेवजी महाराज यांनी मंगळवारी दि. १० मार्च रोजी केले.
बावडा ( ता. इंदापूर ) येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक संकुलच्या श्री शिवाजी विद्यालयाच्या आवारामध्ये पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक दिवसीय योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना स्वामी परमार्थदेवजी महाराज बोलत होते.
योग शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी
प. पु. स्वामी परमार्थदेवजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी प. पू. स्वामी परमार्थदेवजी म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये राग न येऊन देणे व संयम पाळणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. त्यासाठी योग व प्राणायाम आवश्यक आहे. निरोगी जीवन जगण्याची योग, प्राणायाम ही एक यशस्वी जीवन पद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आरोग्यासाठी लाभदायक अशा सर्व प्रकारचे योग, प्राणायामाची तसेच काही योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनीही स्वामी परमार्थदेवजी यांच्याबरोबर योगासनाचा लाभ घेतला.
यानिमित्त हर्षवर्धन पाटील म्हणाले, योग, प्राणायाम ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे. राग आल्याने लिव्हरचे काम कमी होते तर संयम पाळल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यामुळे मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी दैनंदिन योग प्राणायाम करणे ही काळाची गरज आहे.
या योग शिबिरास उदयसिंह पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, डाॅ. लक्ष्मण आसबे, स्वप्निल घोगरे, पवनराजे घोगरे, संतोष सूर्यवंशी, अमोल घोगरे, रणजीत गिरमे, रणजीत घोगरे, आचार्य प्रितीश लाड, आचार्य अविनाश, चंद्रशेखर खापणे, योगरत्न दत्तात्रय अनपट पतंजली योग समिती इंदापूर, प्राचार्य दशरथ घोगरे, ग्रामस्थ, अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी उपस्थित होते. आभार उदयसिंह पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन शब्बीर मुलाणी व अमर निलाखे यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा