Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ मार्च, २०२६

स्वतंत्रपूर्व काळापासून देशसेवेचे बाळकडू स्वतंत्र सैनिक माजी आमदार कै. नामदेवराव जगताप तसेच माजी आमदार कै. कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या रक्तामध्ये होते...., माजी आमदार जयवंतराव जगताप

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



 स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशसेवेचे बाळकडू  तरुणपणी स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कै. नामदेवराव जगताप तसेच स्वतंत्रसैनिक माजी आमदार कै. कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या रक्तामध्येच होते.

 स्वातंत्र्यपूर्व काळ व त्यानंतर ही स्वातंत्र्यानंतर जनतेची सेवा निष्काम सेवा करणारे घराणे म्हणजे जगताप घराणे म्हणले तर वावगे ठरणार नाही

 असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले

 ते करमाळा येथील माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले .. 

यावेळी माजी आमदार श्री जगताप तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करण्यात आला.   

पुढे बोलताना ते म्हणाले की

 करमाळा तालुक्यामध्ये जो विकास दिसत आहे त्याची मुहूर्तमेढच आम्ही रोवलेली आहे तालुक्यातील शिक्षण संस्था ,उजनी , मार्केट कमिटी, भाजी मंडई ,एसटी डेपो, पोस्ट ऑफिस , कुटीर रुग्णालय, होस्टेल विविध गावाचे पाणीपुरवठा योजना, जेऊर येथील मार्केट कमिटी ,संगोबा पाणीपुरवठा योजना, दहेगाव पाणीपुरवठा योजना तसेच लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर मंत्रालयामध्ये विविध विकास कामे पूर्ण केली आजतागायत विकासाचा वसा आमच्याकडून सुरूच आहे..

यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेवक सचिन अब्दुल्ले, नगरसेवक रोहिदास आल्हाट, नगरसेवक अहमद कुरैशी, माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी, असलम वस्ताद कुरेशी ,खाजा उसेन कुरेशी, डॉ. शरद पवार, माजी नगरसेवक किरण बोकन, माजी नगरसेवक मधुकर भुजबळ ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, शिवसेना शहर उपप्रमुख पंकज परदेशी ,खरेदी-विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन जनार्दन नलावडे, अलीम शेख ,अशोक नरसाळे ,नरेंद्रसिंह ठाकुर ,समीर शेख ,आनंद जगदाळे ,पत्रकार राजू सय्यद, खलील शेख, नागेश राखुंडे, रासप  तालुकाध्यक्ष अंगद देवकते, महेश परदेशी ,प्रवीण कुटे, केतन इंदुरे ,गणेश फलफले एस एस फिटनेसचे समीर सय्यद, धनाजी जाधव, पोटेगावचे उपसरपंच झुंबर नाना कावळे, कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत कर्मवीर अण्णासाहेब जगताप  कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अँड शिवराज जगताप यांनी केले. .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा