Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ मे, २०२६

*आ.रोहीत पवार यांची रयत शिक्षण संस्था उपविभागीय अध्यक्षपदी निवडीबद्दल करमाळा शहरात निष्ठावंत कार्यकर्त्यांने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


लोकप्रिय आमदार मा.रोहित(दादा)पवार यांची आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल करमाळा शहरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच याचे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे.या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे मोठे काम अविरतपणे सुरू आहे.आता या संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आमदार रोहित दादा पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.आ.रोहित दादा पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य,तरुणांना रोजगारा-भिमुख शिक्षण मिळावे यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि शैक्षणिक संस्थांना आधुनिकतेकडे नेण्याचा त्यांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ही सन्माननीय निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेचा वारसा पुढे नेणार..कर्मवीर आण्णांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या या पवित्र संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हा माझा मोठा बहुमान आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला.या निवडीचे वृत्त समजताच करमाळा शहरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी करमाळा शहरातील रोहित दादा यांचे विश्वासु निष्ठावंत व रोप फाउंडेशनचे चे ता.अध्यक्ष मुस्तकीम उर्फ एम डी पठान,,राष्ट्रवादी शहराध्यक्ष जमिर सय्यद,,उपाध्यक्ष आझाद शेख,,उद्योजक ईकबाल शेख,,सचिव रमजान बेग,,उद्योजक सुरज शेख,,उपाध्यक्ष ईमत्याज पठान,,सतीश भिसे अभिजीत चव्हाण,,सागर परदेशी,,केतन परदेशी,,मुईन पठाण,,अमनशेठ सय्यद,,भैय्या मिर्झा आदी जण उपस्थित होते.आमदार रोहित दादा पवार यांच्या या नवीन नियुक्तीमुळे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या कामकाजाला एक नवी गती आणि दिशा मिळेल,असा विश्वास रोहित पवार फाउंडेशनचे ता.अध्यक्ष व दादांचे निष्ठावंत मुस्तकीम उर्फ एम डी पठान यांनी व्यक्त केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा