उपसंपादक - नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
गोवा पणजी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील लवंग २५/४ येथील फिनिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपल्या बुद्धिमत्ता,वेग आणि अचूकतेची चमक दाखवली.
या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धकांमध्ये फिनिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये चॅम्पियन किताब व विशेष प्राविण्य पुरस्कार पटकावले.यामध्ये अवघ्या पाच वर्षांच्या अदिती सोमनाथ चव्हाण व गुरुराज अमोल कोळेकर यांनी आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची झलक दाखवत सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.केवळ दहा मिनिटांत २०० गणिते सोडविण्याचे आव्हान असताना अदिती ने अवघ्या ६ मिनिटे ४ सेकंदांत व गुरुराज ने ६ मिनिटे ७ सेकंदात २०० गणिते अचूक आणि अतिशय जलद गतीने सोडवून “चॅम्पियन” हा मानाचा किताब पटकावला.तर तस्मिया सत्तार शेख हिने ६.२० सेकंदात अचूक दोनशे गणिते सोडवून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पुरस्कार मिळविला तर आयशा हमीद कोरबु ६.२५ सेकंद,विश्र्वपरी दशरथ दगडे ६.२७ मिनिटात अचूक गणिते सोडवून चॅम्पियन हा किताब मिळविला तर वल्लभ महादेव कोळेकर,सोहम समाधान जगताप यांनी ७ मिनिट १० सेकंदात २०० अचूक गणिते सोडवून प्रथम श्रेणीत स्थान मिळविले.या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,क्रीडा मंत्री, चॅम्प अबॅकसचे संचालक विशाल माने, स्नेहल माने,फिनिक्स स्कूल संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख, अमोल कोळेकर,समाधान चव्हाण महादेव कोळेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे पालक,शिक्षक आणि संपूर्ण परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत,नियमित सराव आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हे अभूतपूर्व यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.फिनिक्स स्कूल विद्यार्थ्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी शाळेचा व गावाचा नावलौकिक उंचावला आहे.असे मत शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी व्यक्त केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा