Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३१ मे, २०२६

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून व फळे बिस्किटांचे किट वाटप करून साजरा

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


इंदू मिलचे प्रणेते व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या २ जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते ऍड.अमन आंबेडकर साहेब व रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.सुशील सूर्यवंशी साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिपब्लिकन सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने आंबा केळी व बिस्किट यांचे किट वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला.



यावेळी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील रुग्ण तसेच लहान गरजू मुलांना फळे व बिस्किटांच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक भावनिक आणि आनंददा



यी स्वरूप प्राप्त झाले.


या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ अरुण भोसले यांच्या हस्ते रुग्णांना आंबा, केळी व बिस्किटांच्या किटचे वितरण करण्यात आले.



प्रदेश सचिव सोमनाथ भोसले यांचे मनोगत :

"आनंदराज आंबेडकर साहेब हे समाजातील वंचित, गरीब आणि दुर्बल घटकांसाठी सतत झटणारे नेतृत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी कार्य करून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे गरीब गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच आमचे ध्येय असून अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील."


या कार्यक्रमावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओहाळ, रिपब्लिकन सेनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे, युवक तालुका अध्यक्ष विकी लोंढे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष गणेश गायकवाड, अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, शहर उपाध्यक्ष साजिद बागवान, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान, अकलूज शहर कार्याध्यक्ष रवी कोळी तसेच अरुण कोळी, जगू कोळी, अर्जुन कोळी, सागर कोळी, अर्जुन जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





(31 मे 2026)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा