Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३१ मे, २०२६

जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी तृणधान्य हे अमृत आहे : डॉ. श्रेणिक शहा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९


जेष्ठ नागरिक हे समाजाचे आधारवड असून समाज सक्षम व संस्कारक्षम बनवण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य संवर्धन होण्यासाठी रोज तृणधान्य वापरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांनी केले




इंदापूर येथील आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये आयोजित आरोग्य जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रम अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थोरात होते. यावेळी मे महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.



डॉ. श्रेणिक शहा पुढे म्हणाले, ३२ प्रकारचे तृणधान्य, अठरा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतीचे चूर्ण तसेच सात ड्राय फ्रुट असलेले मिलेट्स हे शरीराची रोजची कॅलरीची गरज भागवते तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवते. यामध्ये कुठलेही केमिकल नसल्याने त्याचा शरीरावर कुठलाही दुष्परिणाम नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कुटुंबात तृणधान्यांचा वापर होणे ही काळाची गरज आहे.

अध्यक्ष सुभाष थोरात म्हणाले, जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसल्याने आपले जीवन निरोगी ठेवण्यासाठी आपण विविध प्रयत्न करतो. त्या पार्श्वभूमीवर किंमतीला कमी मात्र गुणाला बहुगुणी असलेले मिलेट्स सर्वांनी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वापरणे गरजेचे आहे.

पुणे येथील डॉ. विकास ओझर्डेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक डॉ. खादिर वली यांनी तृणधान्याचा वापर करून कॅन्सर, मधुमेह, थायरॉईड सह विविध आजार बरे केले. त्यामुळे आपले आयुष्य सुखकर व निरोगी ठेवण्यासाठी याचा वापर सर्वांनी करणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. संदेश शहा म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सन २०२३ हे वर्ष मिलेट वर्ष म्हणून साजरे केल्यानंतर नागरिक तृणधान्य वापरण्या साठी प्राधान्य देत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या तत्वाने सर्वांनी हे वापरून विविध आजारांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

 प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी तर सूत्रसंचलन सचिव हनुमंत शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन सुभाष महाजन सर यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसागर, पांडुरंग जगताप, भानुदास पवार, भाऊसाहेब खबाले महाराज, जवाहर बोरा, पुष्पराज जमदाडे, महादेव तावरे, बळीराम शिंदे, प्रवीण जाधव, अशोक गानबोटे, श्री.  गुजराथी, हमीद आतार, भारत बोराटे, छायाताई देवकर, पोतदार मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी इंदापूर सकाळ तनिष्का प्रमुख सारिका पवार तसेच माजी सैनिक रामदास कुदळे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा