*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील मौजे कंदर येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजप गट नेत्या रश्मी बागल व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय भैय्या बागल यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात भाजप नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील रस्ते, मूलभूत सुविधा व नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध विकासकामांसाठी सुमारे ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांचा लाभ गावातील श्री दत्त वजन काटा ते जाधव वस्ती रस्ता करणे ७.०० लाख , सावंत वस्ती ते पराडे वस्ती रस्ता करणे ६.०० लाख, जिल्हा परिषद शाळा ते माने वस्ती रस्ता करणे ७ .०० लाख रुपये, श्री ज्योतिर्लिंग मंदिर येथे भूमिगत गटार बांधणे १४.०० लाख रुपये, श्री ज्योतिर्लिंग मंदिर येथे सिमेंट काँक्रिट रस्ता करणे ७.०० लाख रुपये, श्री ज्योतिर्लिंग मंदिर येथे स्ट्रीट लाईट पोल शिपटिंग करणे १.०० लाख रुपये, श्री ज्योतिर्लिंग मंदिर येथे विद्युतीकरण करणे ६.०० लाख रुपये , श्रीराम मंदिर परिसरात ३.०० लाख रुपये सिमेंट काँक्रिटीकरण करणे या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर राहणारे नागरिक तसेच शेतकरी बांधवांना होणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी बोलताना दिग्विजय भैय्या बागल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने लोकहिताची विकासकामे सातत्याने राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत भविष्यातही विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजपा अध्यक्ष सचिन पिसाळ, संचालक सतीश नीळ, कल्याण सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, संचालक कुलदीप पाटील, कंदरचे सरपंच मौला मुलाणी, कंदर गावच्या कन्या पोलीस निरीक्षक भगत मॅडम, तंटामुक्त समिती अध्यक्ष नानासाहेब लोकरे, अरुण सरडे, मारुती यादव,महावीर तळेकर, रवी जाधव, गोरख जगदाळे, तानाजी देशमुख, दत्तात्रय सोनवणे, वाघज आप्पा, माजी चेअरमन बाळासाहेब पराडे, सुभाष पवार, रावसाहेब जाधव,पंचायत समिती सदस्य नितीन तकीक, डॉ. विजय रोकडे, मकाईचे संचालक विष्णु माने, विकास सोसायटीचे चेअरमन आबा लोकरे, राजकुमार सरडे, बाळासाहेब घाडगे, संतोष माने, धर्मराज लोकरे यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दिग्विजय भैय्या बागल यांचा सत्कार सरपंच मौला मुलाणी व कार्यक्रमाचे संयोजक रंगनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर शिंदे यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा