Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मे, २०२६

*कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.72 टक्के* *तर विद्यालयात प्रिया गुटाळ प्रथम, प्रांजली भोसले द्वितीय,तर तेजस्विनी कन्हेरे तृतीय क्रमांक पटकावला...*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल 97.72 टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी 

कु .गुटाळ प्रिया महेश हिने 

92.80 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर कु.भोसले प्रांजली दत्तात्रय या विद्यार्थिनीने 86.40 % गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला . कु .कन्हेरे तेजस्विनी भाऊसाहेब  या विद्यार्थिनिने 

84.80 % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला असून 

कु .शिंदे तनुष्का सुनील हिने 

83.60 % गुणांसह चौथा तर 

कु.कन्हेरे गायत्री उमेश हिने 

81.60 % गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल मा. माजी आमदार सौ. श्यामलताई दिगंबरराव बागल, जिल्हा परिषद गटनेत्या तथा सदस्या सौ. रश्मी दिदीसाहेब बागल, मकाई साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय भैय्यासाहेब बागल, यशकल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे-पाटील, अक्कलकोट देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, विश्वस्त भारतभाऊ शिंदे, अॅड. बाळासाहेब मुटके, मंत्रालय कक्ष अधीक्षक अजय साखरे, शासकीय अभियंता मधुकर सुर्वे, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

व विद्यालयाच्या यशाच्या परंपरेचे कौतुक करीत मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे अभिनंदन केले. शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ दादा जाधव यांच्या कर्तव्याची प्रशंसा केली. व सेवक बलभीम वाघमारे, किशोर कदम, नंदकिशोर कांबळे, संतोष घोरपडे यांचे कौतुक केले. 

आजी माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र गणेश मित्र मंडळ, जनसेवा नवरात्र मित्र मंडळ, शिवस्वराज्य प्रतिष्ठान, ज्योतिर्लिंग गणेश मित्र मंडळ, शिवराजे ग्रुप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, भीम आर्मी, छावा समूह आदी संघटनांसह कुंभेज व पोफळज गावचे सरपंच, उपसरपंच आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा