Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

*ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर काळाची गरज--महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



डायलिसिस ही मोठी गंभीर समस्या झाली असून ग्रामीण भागातील रुग्णाला त्याच्या गावातच डायलिसिस सेंटर असणे काळाची गरज असून ही गरज खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून  पूर्ण करून करमाळा सारख्या ग्रामीण भागात उभा केलेला डायलिसिसचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले 

 करमाळा येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने मोफत डायलिसिस सेंटर उभा करण्यात आले असून गेली तीन वर्षापासून तालुक्यातील रुग्णांना या माध्यमातून मोफत सेवा दिली जात आहे या उपक्रमाला आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली 
 बावनकुळे यांचा हाल शाल श्रीफळ देऊन डायलिसिस सेंटरचे संचालक दीपक पाटणे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला  

  बावनकुळे म्हणाले की मंगेश चिवटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात स्वतःच मोठे योगदान दिले असून एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो या डायलिसिस सेंटर मधून रुग्णाकडून एकही रुपया न घेता मोफत सेवा दिली जाते ही अभिमानाची गोष्ट आहे 
 महायुतीच्या सरकारमध्ये राज्यातील कोणताही रुग्ण उपचार अभावी दगावला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असल्याचे सांगितले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा