*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
संकटे कितीही मोठी असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे प्रगती विद्यालय मांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील दहावी मधील विद्यार्थिनी महेक पठाण हिने सिद्ध करून दाखवले आहे.
दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत येण्याचा मान तिने मिळवला आहे. महेक तय्यब पठाण हिने मिळवलेले हे यश तिच्या प्रामाणिकपणाचे आणि कष्टाचे फळ आहे. अत्यंत प्रतिकूल आणि सामान्य परिस्थितीत राहून तिने अभ्यासात सातत्य राखले. कोणत्याही मोठ्या सुखसोयी उपलब्ध नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर तिने फर्स्ट क्लास अर्थात प्रथम श्रेणीत अव्वल येण्याचा मान पटकावला आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. महेकने मिळवलेल्या या उत्तुंग यशात तिच्या पालकांचा आजोबांचा आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात मोठा वाटा आहे.
महेकने या दैदीप्यमान यशामुळे वडगाव सह संपूर्ण करमाळा तालुक्यात तिचे अभिनंदन होत आहे. प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापिका अनुपमा बागल वर्गशिक्षक गोमे सर तसेच महेकचे आजोबा दस्तगीर पठाण, हुसेन पठाण, खाजा पठाण तसेच सर्व शिक्षकांने तिचे विशेष कौतुक केले आहे.
एका ग्रामीण भागातील मुलीने प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. विशेष म्हणजे महेकणने कोणत्याही पद्धतीची शिकवणी न लावता तिने हे यश मिळवले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा