Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

गणेशवाडी येथील रोहीत्र पाच दिवसापूर्वी जळाले, महावितरणच्या दुर्लक्षाने पाणी व दळणासाठी महिलांची पायपीट, अन्यथा दळण,पाण्यासाठी कार्यालयावर महिला धडकणार

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


          गणेशवाडी ( ता. इंदापूर ) येथील गावाला वीजपुरवठा करणारे रोहीत्र पाच दिवसापूर्वी जळालेले आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, दळण, विजेअभावी महिला व नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. तर असह्य उकाड्यामुळे वृध्द, लहान बालके, महिलांची मोठ्या प्रमाणात घालमेल होत आहे. महावितरण मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने दाद कोणाला मागायची असा सवाल नागरिक करत आहेत. 

      बावडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गणेशवाडी गावाला वीजपुरवठा करणारे रोहीत्र ऐन उन्हाळ्यात जळालेले आहे. त्यामुळे घरगूती विज बंद असून पिण्याचे पाणी, दळणासाठी महिलांना दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची गरज असल्याने विजेअभावी चार्जिंग न झाल्याने मोबाईल बंद पडले आहेत. तसेच असह्य उकाड्यामुळे वृध्द, लहान बालके, महिलांना मोठ्या हाल अपेष्टा सहन करण्याची वेळ आली आहे.

        रोहित्र जळाल्याने दुसरे रोहीत्र कधी मिळणार याची विचारणा महावीतरणचे बावड्याचे शाखा अभियंता घोलप यांना फोन केला असता मला रोहित्र जळाल्याचा रिपोर्ट आज सोमवारी मिळाला असून पुढील कार्यवाही करीता वरिष्ठांकडे पाठवला आहे.  तसेच बारामतीचे कार्यकारी अभियंता व इंदापूरचे उपकार्यकारी अभियंता यांना फोन केला असता सदर बाबत तपासणी करून पुढील व्यवस्था करतो असे सांगितले. 

    दरम्यान रोहीत्र जळून पाच दिवसाचा कालावधी लोटला असल्याने विज, दळण, पाण्याअभावी महिला व नागरिकांचे मोठे हाल होऊ लागले आहेत. तसेच बाहेर उन्हामुळे असह्य उकाडा असल्याने बाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. तातडीने रोहीत्र बसवून विज पुरवठा पुर्ववत सुरू करावा अन्यथा दळण, पाण्यासाठी अधिकारेंच्या कार्यालयावर लहान बालके, वृध्दांना हंड्यासह धडक मारण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

फोटो  - गणेशवाडी गावाला वीजपुरवठा करणारे रोहीत्र पाच दिवसापूर्वी जळाल्याने विज पुरवठा बंद आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा