Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मे, २०२६

बोराटवाडी चौफुल्यात श्री म्हसोबा देवस्थान यात्रा उत्सवाची जय्यत तयारी १५ मे रोजी यात्रेनिमित्त लावणी सम्राज्ञी राधिका पाटील यांच्या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन

 *मोहसिन शेख--प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-95034 58834*


बोराटवाडी चौफुला येथे श्री म्हसोबा देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी होणाऱ्या या यात्रा समारंभासाठी श्री म्हसोबा देवस्थान यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे.

यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह रात्री ९ वाजता विशेष मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लावणी सम्राज्ञी राधिका पाटील यांच्या बहारदार लावणी कार्यक्रमाची रंगत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.



यात्रा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी ग्रामस्थांकडून नियोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा