Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० जून, २०२६

*आवाटी विकास सोसायटीचे चेअरमन" उस्मान खान" यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

 *करमाळा-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी



आवाटी तालुका करमाळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उस्मान हनीफ खान वय 83 यांचे बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तसेच एक मुलगा आठ मुली सुना नातवंडे पणतु असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर आवाटी येथील हजरत आबिद अली शहा कादरी शेजारील कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे दफन विधी करण्यात आले उस्मान खान हे आवाटी येथील हजरत वली चांद पाशा यांचे ते निस्सिम भक्त होते त्यांच्या अंत्ययात्रेला मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोकुळ नलावडे, माजी निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान माजी सरपंच साबीर खान सरपंच इमरान खान उपसरपंच तनवीर शेख श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत अंबारे, करमाळा येथील बार कौन्सिलचे उपाध्यक्ष एडवोकेट अलीम पठाण माजी सरपंच दादासाहेब बंडगर माजी उपसरपंच संतोष सोनवर आदी मान्यवर सहित निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते आवाटी सोसायटी चे 1995 पासून आज पर्यंत 31 वर्ष चेअरमन पदावर कार्यरत होते माजी आमदार जयंतराव जगताप गटाचे ते खास समर्थक होते आवाटी येथील माजी उपसरपंच राजू खान यांचे ते वडील होत

आवाटी तालुका करमाळा येथील विका. सोसायटीचे चेअरमन उस्मान खान यांच्या निधनाबद्दल माजी आमदार जयंतराव जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा