Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० जून, २०२६

*आदिनाथ मकाई कमलाई व विठ्ठल या कारखान्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारात राजकीय लागेबांधे,,,,,,,,,,,,सूनील तळेकर

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


म्हैसगाव येथील श्री विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याकडे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे पैसे येणे बाकी असताना विठ्ठल कारखाना विकला गेला तरी बागल प्रणित आदिनाथ कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळानी पैसे वसूल करुन घेतले नाहीत असा खळबळजनक आरोप आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे व मकाई कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेले आरोप खुडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आज तळेकर यांनी एक नवीन आरोप बागल गटावर केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. आदिनाथ मकाई कमलाई व विठ्ठल या कारखान्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारात राजकीय लागेबांधे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा घणाघाती आरोप आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. यावर अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या खाजगी मालकीचा असलेल्या म्हैसगाव ता माढा येथील श्री विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याबरोबर बागल गटाच्या ताब्यात आदिनाथ कारखाना असताना काही आर्थिक व्यवहार झाले. परंतु श्री विठ्ठल कार्पोरेशन लि हा कारखाना आदिनाथची येणेबाकी रक्कम थकीत असतानाही परस्पर विकला गेला. दिनांक ३ डिसेंबर २०१५ रोजी जर्नल व्हाउचर क्रमांक ५९०, चेक क्रमांक ०१२२०२ नुसार चिखलठाण येथील युनिअन बँकेमधील आदिनाथच्या खात्यामधून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या म्हैसगाव ता. माढा येथील कारखान्यास १५ लाख रुपये देण्यात आले होते. दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी जर्नल व्हाउचर क्रमांक १७१९ नुसार आदिनाथला यातील  ८ लाख १५ हजार २२४ रुपये विठ्ठल कारखान्याकडून परत मिळाले. यानंतर थकबाकी असतानाही परत एकदा श्री विठ्ठल कारखान्यास आदिनाथने दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी जर्नल व्हाउचर क्रमांक ३२५, चेक क्रमांक ००७५०१ नुसार चिखलठाण येथील डि.सी.सी बँकेमधील आदिनाथच्या खात्यातुन १५ लाख ६५ रुपये देण्यात आले. यातील दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी जर्नल व्हाउचर क्रमांक ७५७ नुसार १३ लाख ४० हजार ५१८ रुपये आदिनाथला परत मिळाले. यामुळे आजमितीस ३१ मार्च २०२६ अखेर एकेकाळी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या श्री विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याकडे ८ लाख ४४ हजार ३२३ रुपये बाकी तशीच राहिली गेली आहे.माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांच्या मालकीचा श्री विठ्ठल कार्पोरेशन लि हा कारखाना विकला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदिनाथची देणे बाकी असताना स्वतःचा कारखाना विकुन आदिनाथची निवडणुक संजयमामा शिंदे यांनी लढवली. पण तरीही धनंजय डोंगरे मुग गिळून गप्प राहिले.त्यांनी या कारखान्याकडील येणे बाकी रक्कम मागितली नाही. असे अनेक थकबाकीचे आकडे येत्या काही दिवसांत बाहेर पडतील.यामुळे यात सगळे राजकीय लागेबांधे गुंतले आहेत हे दिसून येते. अडचणीत असताना सर्वच जण एकमेकांना मदत करतात हे एक नवलच आहे. विशेष म्हणजे एक विक्रीत तर बाकीच्यांचे गळीत हंगामच नाहीत. बागल आणि शिंदे यांच्यातील "ये रिश्ता क्या कहलाता है" हे सभासदांना कधी सांगितले गेले नसल्याचा आरोप सूनील तळेकर यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा