*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील रोटरी वर्ष २०२६-२७ साठी रोटरी क्लब अकलूजच्या अध्यक्षपदी रो.डॉ. मनिष गायकवाड यांची तर सचिवपदी रो.अभिषेक टेके यांची निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर रोटरीच्या विविध कार्य क्षेत्रांसाठी नवीन संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये सीए शशिल गांधी यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून नवनाथ नागणे (उपाध्यक्ष व टीआरएफ संचालक), जयदीप बोरावके (सहसचिव व क्रीडा संचालक), बबनराव शेंडगे (क्लब प्रशासन संचालक), सीए नितीन कुदळे (सभासदत्व संचालक), माजी अध्यक्ष केतन बोरावके (सार्वजनिक प्रतिमा संचालक), कल्पेश पांढरे (अध्यक्ष नियुक्त), अजिंक्य जाधव (तरुण पिढी सेवा संचालक), स्वराज फडे (आंतरराष्ट्रीय सेवा संचालक), राजीव बनकर (सार्जंट-ॲट-आर्म्स), ओजस दोभाडा (साक्षरता व सांस्कृतिक संचालक), आएशा शेख (स्त्री सक्षमीकरण संचालक), डॉ. अभिजित मगर (सेवा प्रकल्प संचालक), ॲड. दीपक फडे (क्लब शिक्षण सूत्रधार संचालक) तसेच वाय.एन.याबाजी (व्यावसायिक सेवा संचालक) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ सदस्य मकरंद जामदार,ॲड. प्रवीण कारंडे आणि आशिष गांधी हे सल्लागार समिती सदस्य म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी अध्यक्ष डॉ.मनिष गायकवाड यांनी सांगितले की, नवीन रोटेरीएन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असून आगामी रोटरी वर्षात विविध समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळास पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना गजानन जंवजाळ यांनी अभिनंदन केले व आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा