उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
करमाळा तालुका पत्रकार संघटनेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अलीम मोहम्मदशरीफ शेख यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या राज्य सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे सदरची निवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी केली आहे सदरची निवड ही सन 2026 ते 2027 वर्षाकरिता झाली आहे
ज्येष्ठ पत्रकार अलीम शेख हे गेली 35 वर्षापासून राज्यातील विविध नामांकित दैनिकात करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांनी त्यांची पत्रकारिता सन 1989 पासून दैनिक प्रभात पुणे या नामांकित दैनिका पासून चालू केली होती त्यांनी विविध दैनिकांमध्ये वृत्तपत्र लेखक म्हणून देखील काम पाहिले आहे पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या राज्य सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार अलीम शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे करमाळा तालुका मराठी पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ सक्रिय, वृत्तपत्र लेखक संघटना तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संघ आदि विविध सामाजिक राजकीय संघटना यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या राज्याच्या सदस्य पदी माझी निवड झाल्याबद्दल मी शासन दरबारी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहील असे ज्येष्ठ पत्रकार आलिम शेख यांनी बोलताना सांगितले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या राज्य सदस्य पदी अलीम शेख यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
🌹शुभेच्छुक -- मुख्य संपादक हुसेन मुलानी, कार्यकारी संपादक-शौकत तांबोळी, उपसंपादक, नूरजहाँ शेख ,टाइम्स 45 न्यूज मराठी आणि समुह🌹




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा