Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जून, २०२६

शेलगाव वांगी येथील कुमारी अनुश्री खाडे हिची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड, साऊथ आफ्रिकेला रवाना

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*





करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील वंजारी समाजाची कन्याकुमारी अनुश्री खाडे हिची वैमानिक प्रशिक्षणासाठी नुकतीच निवड झाली आहे 

शेलगाव(वांगी)ता.करमाळा जि.सोलापूर गावची कन्या कुमारी अनुश्री रमेशराव खाडे ही वैमानिक (पायलट) होण्यासाठीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन फ्लाइंग प्रक्षीक्षण साठी दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी साऊथ आफ्रिका येथे रवाना झाली आहे सेवानिवृत सहाय्यक पोलिस आयुक्त श्री रमेशजी खाडे यांची ती कन्या आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमती कुसुमताई चंद्रप्रकाश दराडे यांची ती नात आहे.

     पायलट होणारी अनुश्री खाडे ही वंजारी समाजातील पहिली महिला असणार आहे.

   या प्रशिक्षणासाठी रवाना होत असताना पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे , माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे, पदमश्री डॉ तात्याराव लहाने,आमदार नारायण आबा पाटील(करमाळा) आमदार रत्नाकरजी गुट्टे,IAS  प्रधान सचिव श्री प्रवीणजी दराडे,IAS श्री सागरजी डोईफोडे, GST अतिरिक्त आयुक्त श्री दिलीपराव ढोले,करमाळा प्रांत श्रीमती जयश्री आव्हाड , GST उपायुक्त श्री छगनराव जायभाये, रेल्वे बोर्ड सदस्य श्री धनराज गुट्टे श्री चंद्रप्रकाश दराडे (गुरुजी), श्री सुहास दराडे, श्री.प्रशांत दराडे,श्री हर्षवर्धन खाडे, नवनाथ आबा केकान तसेच शेलगावचे सरपंच अमरदादा ठोंबरे , उप सरपंच भारत पोटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदींनी कुमारी खाडे हिचे विशेष अभिनंदन केले आहे 

    वंजारी समाजातील पहिली महिला पायलट म्हणून करमाळा तालुक्याच्या इतिहासात नोंद झाल्याने कु अनुश्री रमेश खाडे हिचे सर्वच क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा